‘छत्रपती शिवाजी महाराज’ असाच उल्लेख हवा; छत्रपती संभाजींची मागणी

काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो वा केंद्रीय रवीशंकर प्रसाद यांच, त्या दोन्ही वेळी जाब विचारला जात होता. मात्र यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले.

…तर हे सरकार ५ वर्ष टिकणार नाही; रघुनाथ पाटील यांचा इशारा  

अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

उदयनराजे आणि शिंदेंची ‘तेरी मेरी यारी…’

या दोन नेत्यांच्या “दिल-दोस्ती-दुनियादारीची” चर्चा साताऱ्यात कायमच रंगलेली असते. परंतु निवडणूक लागल्या आणि यांच्या दोस्तीत काहीसा दुरावा पाहायला मिळाला. कारण पक्षनिष्ठेला वाहून घेतलेल्या शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंच्या पराभवासाठी मेहनत घेतली. तर, कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी उदयनराजेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला.

मारूंजी परिसरात आढळला तरूणाचा मृतदेह

मारूंजी येथील कोलते पाटील सोसायटी जवळील मोकळ्या मैदानात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भोसरीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; तीनजण गंभीर जखमी

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर वनवाडीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MTNL, BSNL ची स्वेच्छानिवृत्ती योजना बंद; स्वेच्छानिवृत्तीसाठी तब्बल ९२ हजार अर्ज

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याचवेळी या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेची घोषणाही करण्यात आली होती.

एड्स दिनानिमित्त एड्सबाधित मुलांसाठी ऊर्जापूर्ण योग कार्यशाळा

‘जागतिक एड्स दिना निमित्त’ कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्राच्या वतीने, ममता फाऊंडेशन संस्थेतील एड्सबाधित मुला-मुलींसाठीसाठी एका मनोरंजनात्मक तसेच उर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

हैद्राबाद मध्ये घडलेल्या अत्याचाराने तर संपूर्ण देशच हादरला आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यात घडली होती. या घटनेतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

…त्या आईनेच केला होता चिमुरडीचा खुन; मयत आईवर गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.