पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | संजय राऊतांनी भाजपला फटकारले

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. राजकारणात एखाद्या व्यक्तीच्या बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढले आहे. यामुळे सरकारला त्रास होईल असं विरोधकांना … Read more

भाजप याआधी धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, मंत्र्यांची बदनामी करण्याची त्यांना सवय लागलीये- हसन मुश्रीफ

Hasan mushrif

कोल्हापूर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधलाय. भाजप धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आहे. सदर प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी … Read more

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर

Uddhav Thackarey

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेतलं आहे. गुप्ता यांनी वर्षावर येऊन पूजा आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आत्महत्या कशी झाली? प्रत्यक्ष साक्षीदारांच्या नोंदी, मेडिकल रिपोर्ट आदींची गुप्ता … Read more

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण: वाट कसली बघतायेत, संजय राठोडांच्या मुसक्या आवळा; चित्रा वाघ यांची आक्रमक मागणी

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झालीय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा, असं म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय. “पूजा चव्हाणची … Read more

..तर ‘शक्ती कायदा’ चाटायचाय का?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नितेश राणे आक्रमक

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. तसेच आता पुन्हा एकदा भाजप कडून राज्यातील ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता। भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर … Read more

जे दिशासोबत झालं तेच पूजासोबत होणार असेल तर ‘शक्ती कायदा’ काय चाटायचाय का?- नितेश राणे

nitesh rane uddhav thackarey

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झालीय. तसेच महाविकास आघाडीतील असलेले घटकपक्षही शिवसेनेवर दबाव निर्माण करत आहेत. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. नितेश राणेंनी ट्विटवर ट्विट करत शक्ती कायद्यावरून महाविकास आघाडीच्या भूमिकेवर टीका … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेना अडचणीत आलीय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं असल्याचे वृत्त टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिलंय. शिवसेना नेते संजय राऊत … Read more

पूजा चव्हाण आत्महत्येची चौकशी करा! प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करु नका – देवेंद्र फडणवीस

मुंबई । पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. ”बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे’, असे नमूद करत या … Read more