पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण | अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला (Arun Rathod) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी … Read more

राजीनामा तर घेतला चौकशीचे काय? न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांना बंजारा समाजाचा सवाल!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर संपूर्ण महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकारण व समाजकारण तापलेले असताना. शेवटी संजय राठोड या मंत्र्यांनी राजीनामा तर दिला. पण तो फक्त राजीनामा देऊन भागणार नाही. त्यासाठी निपक्ष व न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे. तेव्हाच सत्य बाहेर येईल पूजा चव्हाण यांच्या कुटुंबास खरा न्याय मिळेल. असे प्रतिपादन बंजारा समाजाच्या वतीने माजलगाव … Read more

मोठी कारवाई! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी घेतलं 2 जणांना ताब्यात

Pooja chavan

पुणे । गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide case) प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकाने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन … Read more

‘त्या’ मुलीला न्याय हा नक्की मिळेल! पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

अहमदनगर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case)राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना आमदार आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येताच शिवसेनेच्या अडचणीत वाढत आहेत. भाजपनं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण लावून धरत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलं आहे. भाजपकडून संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर … Read more

संजय राठोड मीडिया ट्रायलचे बळी- विजय वडेट्टीवार

चंद्रपूर । पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती असल्याचेही ते म्हणाले. ”भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे म्हणाले…

मुंबई । परळीची राहवाशी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड याचे नाव भाजपाकडूनघटिले जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल क्लिपवरून भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि … Read more

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार; गृहमंत्र्यांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्यशासन निर्णय घेणार आहे.”  असं आज(सोमवार) राज्याचे … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणः भाजपा आमदाराला धमक्यांचे फोन; ठाकरे सरकारवर केले गंभीर आरोप

मुंबई । परळीतील पूजा चव्हाण ( Pooja Chavan Suicide Case) या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे एक मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी याप्रकरणी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनं सातत्याने हा मुद्दा उचलून धरला असतानाच भाजपचे … Read more

पर्यावरणमंत्र्यांची ‘दिशा’ चुकली मग आता वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत- नितेश राणे

मुंबई । पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यावरुन भाजपनं ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. तसंच, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा … Read more

आमची बदनामी थांबवा नाहीतर मी आत्महत्या करेन ; पूजाच्या वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया

Pooja chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पूजाचे वडील लहू चव्हाण अत्यंत व्यथित झाले आहेत. लेक गमावल्याने लहू चव्हाण यांच्यावर खूप मोठा आघात झाला असून पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांनी ते अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच आमची बदनामी थांबवली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया लहू चव्हाण यांनी … Read more