शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची परभणीमध्ये होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे – सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाच्या प्रतींची होळी करत आंदोलन केले. अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने न पाळता शेतकर्‍यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, परभणी मध्ये आज … Read more

कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून दडपले जाणार- पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काल साताऱ्यातील कराड इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. तसेच काल महाजनादेश यात्रेदरम्यान रस्त्यावर प्रचंड बंदोबस्त असताना, सुरक्षा यंत्रणेला चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून निषेध व्यक्त केला. पलूस … Read more

खा. उदयनराजे भोसले आणि राजु शेट्टी बैठक संपन्न

सातारा प्रतिनिधी | ‘विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जावु नका’ अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांना केली. राजू शेट्टी हे खा. उद्यनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी सातारा इथं गेले असता चर्चेदरम्यान शेट्टी यांनी उदयनराजेंना ही विनंती केली. याबाबत बोलत असताना उदयनराजे म्हणाले की, ‘भाजपात प्रवेश करायचा की … Read more

राजू शेट्टी खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला; मनधरणीचा प्रयत्न

सातारा प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला साताऱ्यात गेले असून उदयनराजेंच्या मनधरणीचे पुन्हा प्रयत्न सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उदयनराजे भोसले विरोधी पक्षाचा बळकट आवाज आहेत. सर्वसामान्यांच्या आवाजासाठी तुमच्या सारख्या विरोधी पक्षनेत्याची गरज असल्याचं यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान राजू शेट्टी यांनी आहे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या … Read more

महाआघाडीसाठी स्वाभिमानीचा १ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेसह सर्व राजकीय पक्षांनी सरकारविरोधात मोट बांधली पाहिजे. महाआघाडी साठी स्वाभिमानी शेतकरी पक्ष प्रयत्नशील असून आघाडीसाठी 1 ऑगस्टपर्यंत वाट पाहू, अन्यथा स्वतंत्र लढण्यात येईल, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिला.  स्वाभिमानीचे ४९ उमेदवार … Read more

थकीत बिलासाठी स्वाभिमानीचा केन आग्रोवर मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत या मागणीसाठी आज केन ऍग्रो साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी २८ जून पर्यंत बिले देतो असे लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. २८ जून पर्यंत बिले न दिल्यास २९ जून पासून कारखान्याचे अध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन … Read more

शिवसेनेचे धैर्यशील माने राजू शेट्टींच्या घरी, शेट्टींच्या आईने दिला हा आशिर्वाद

कोल्हापूर प्रतिनिधी | जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ज्या राजू शेट्टी यांचा पराभव केला ते शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी खुद्द राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. शिरोळ परिसरात असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन माने यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतल्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा पॅटर्न सुरु झाला आहे. तसेच माने यांनी राजू शेट्टींच्या घरी … Read more

राजू शेट्टींचा विजय म्हणजे देशातील शेतकऱ्याचा विजय – योगेंद्र यादव

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाल्यास तो देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल, असे मत ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक आणि स्वराज अभियान संघटनेचे संस्थापक योगेन्द्रसिंह यादव यांनी गुरुवारी कोल्हापूरात व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी अर्ज भरला. त्यांच्या प्रचारासाठी योगेंन्द्रसिंह यादव कोल्हापूरात आले होते. त्यावेळी … Read more