मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!! ‘या’ 8 मंदिरांच्या जीर्णोद्धाराला हिरवा झेंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने हिंदुत्त्व सोडलं, असा आरोप सातत्याने भाजपकडून सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला हिरवा झेंडा दाखवत विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आज आढावा घेतला. यामध्ये प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन लेण्यांच्या अनुषंगाने खोदकाम, महावारसा सोसायटीची स्थापना करणे, गड- किल्ल्यांचे … Read more

वैद्यनाथ मंदिरानंतर आता ‘या’ मंदिराला आरडीएक्सने उडवण्याच्या धमकीने खळबळ

parli

बीड – परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे … Read more

तोफेच्या सलामीने कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात घटस्थापना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवरात्रोत्सवास आजपासून थाटात प्रारंभ झाला. या दिवशी घटस्थापना केली जाते. साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचे पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज सकाळी तोफेची सलामी देऊन घटस्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी कोल्हापुरात तोफेच्या सलामीनंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला सुरवात होते. राज्य सरकारने कोरोनापासून बंद ठेवलेली मंदिरे आजपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवरात्रोस्तवाच्या … Read more

७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना प्रादुर्भाव मुळे अनेक दिवसांपासून राज्यातील बंद असलेली मंदिरे पुन्हा एकदा उघडण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र … Read more

Breaking News : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त; भाजपला दणका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचा अध्यक्ष असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पाश्वंभूमीवर भाजपला हा मोठा दणका बसला आहे. राज्य सरकारने नुकताच अद्यादेश जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडे पाठवला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पश्चिम … Read more

जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिरात लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच एका दिवसात मिळाली 1 कोटी रुपयांची देणगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन झाल्यानंतर गेल्या शनिवारी पहिल्यांदाच उघडलेल्या तिरुपती बालाजी मंदिराला त्याच दिवशी 1 कोटीहून अधिक देणगी मिळाली आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) यांनी ही माहिती दिली आहे. कोविड -१९ च्या संकटकाळात सर्वप्रथम भक्तांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, 11 जून रोजी मंदिर यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडले आहे. मंदिर पुन्हा उघडल्यानंतर हुंडीमध्ये … Read more

मंदिरं खुली करण्यासाठी आंबेडकरांनंतर आता आठवले करणार आंदोलन

 मुंबई । रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा जाहीर केलं आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची जनजागृती झालेली असल्यानेच मंदिरं सुरू करावी, असंही आठवले यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता रामदास आठवले यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलनाची हाक … Read more

राज्यातील मंदिरं आणि जीम पुन्हा सुरू करण्याबाबत संजय राऊतांचे मोठं विधान, म्हणाले..

मुंबई । राज्यातील मंदिरं आणि जीम पुन्हा सुरू करण्याबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं … Read more

मंदिरे खुली करण्यासाठी सर्व साधुसंतांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

मुंबई । लॉकडाऊनला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आव्हान देणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या पेच प्रसंगांवर आपली मते परखडपणे मांडली. राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करावी, याशिवाय मंदिरे खुली करण्यासाठी सर्व … Read more

राज्यात मॉल्स उघडलेत, मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

मुंबई । जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आज त्र्यंबकेश्वर येथील १० पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेऊन राज्यातील सर्व मंदिरं (temple) आणि धार्मिक स्थळं सुरू करण्याची मागणी केली. त्यावर राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवितानाच काही … Read more