शरद पवारांच्या नावाने ग्रामसमृद्धी योजना ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येत्या १२ डिसेंबरला वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत असून त्या निमित्ताने राज्य शासनाने त्यांच्या नावे एक योजना सुरू करून गौरव केला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समन्वयातून राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा … Read more

केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र ; उदयनराजे कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे, असा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना … Read more

12 महिने झाले तरी त्यांचे 3 महिने संपेना ; रोहित पवारांचा रावसाहेब दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 12 महिने पूर्ण झाले तरी यांचे 3 महिने काही संपेना’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल असा दावा रावसाहेब दानवे यांनी परभणीत केली होती. त्याला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर … Read more

एक वर्ष पूर्ण होऊनही आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही ; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने विश्वासघात करत तीन पक्षाचे सरकार स्थापन केलं. आता या सरकारला एक वर्ष झालं. पण एक वर्षात आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही” असा घणाघात हल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे. नागपूर पदधीवर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून पूर्व विदर्भ पदवीधर … Read more

सरकारमध्ये नाराजी आहे ; पण…. संजय राऊतांचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज लोक असतातच. इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. त्यात नाराजी आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे, पण तरीही सरकार टिकेल,’ असा ठाम विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती’, असं … Read more

पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले ; संजय राऊतांनी सांगितला सत्ता वाटपाच्या बैठकीतला किस्सा

Raut and Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आघाडी करून राज्यात प्रथमच महाविकास आघाडीची स्थापना होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या आघाडीचे एक शिल्पकार असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी सरकारच्या … Read more

मंत्रिमंडळाची सुरुवात U नेआणि शेवट A ने ; उलट्या बाराखडी प्रमाणे कामही उलटसुलट – मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने भाजप कडून ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. “या सरकारच्या मंत्रिमंडळाची सुरुवात U अक्षराने आणि शेवट A ने आहे. यांची … Read more

उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट … Read more

नारायण राणे म्हणजे गंजलेली तोफ ; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

Narayan Rane Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार हे सक्षम असून यशस्वीपणे काम करत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आराेप करत सुटले आहे. परंतु नारायण राणे हे गंजलेली ताेफ आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गाेळ्यांना आम्ही महत्त्व देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टाेला लगावला … Read more

महाविकास आघाडीचे 1 वर्ष पूर्ण झाले, अजून 4 वर्ष नक्कीच पूर्ण होतील – शिवसेनेला विश्वास

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खडेबोल सुनावले आहे. “विरोधी पक्ष मंत्रालयाच्या पायरीवर वर्षभरापासून उभा आहे व पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल. पायरी खचेल, पण तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार नाही. भारतीय जनता पक्षाने हे सरकार … Read more