मोठी बातमी! मुंबईत कलम 144 लागू; ओमिक्रोनमुळे ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई । कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच भारतात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने एंट्री केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३२ वर पोहचली त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली असून भारतासाठी ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकादायक ठरू शकतो, या व्हेरिएंटमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. … Read more

आशिष शेलारांवरील तक्रारीवर फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया उत्तर; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत … Read more

ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोर झुकणार नाही; महापौरांच्या तक्रारीनंतर शेलारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस दलाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस … Read more

सरकारने निजामशाही कारभार करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर वीज तोडणीवरून निशाणा साधला आहे. “अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीने वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमके त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार राज्य सरकारने चालवला आहे, सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा … Read more

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट ; विक्रम पावसकरांची टीका

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून सध्या ठाकरे सरकावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. या दरम्यान सातारा जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज प्रसिद्धिपत्रक काढून ठाकरे सरकारवर आरोप केला आहे. ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट असल्याचा आरोप पावसकर यांनी केला आहे. विक्रम पावसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हंटले आहे की, काँग्रेसच्या … Read more

ओबीसी आरक्षण प्रश्न : राजेश टोपेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, १०५ नगरपंचायती आणि सात हजार ग्रामपंचायतींच्या ठिकाणी इतर मागास प्रवर्गासाठीच्या जागांवर आता मतदान होणार नाही. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री … Read more

वाघ हा डरकाळ्या फोडतो, वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप नेत्यांबरोबर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये … Read more

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा राजीनामा ; उपराष्ट्रपतींना पाठवलं पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळावरून १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (Shivsena MP Priyanka Chaturvedi) यांचा देखील समावेश आहे. संसदेतून निलंबन झाल्यानंतर त्यांनी संसद टीव्हीच्या अँकर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. सांसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरून मी … Read more

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क; आज मुख्यमंत्री करणार टास्क फोर्सशी चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक पाठोपाठ गुजरातनंतर महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यामध्ये राज्यातील कोरोना परिस्थिती, नव्या ओमिक्रॉन वेरिएंटबाबत सविस्तर माहिती घेणार आहेत. … Read more

भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ममतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे असेच चित्र उभे राहिले आहे. याबाबत भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपाचा शिवसेनेने आज समाचार घेतला आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए नाही तसा एनडीएही नाही. यूपीए नाही … Read more