राज्यात आज सर्वाधिक ३ हजार ६०७ कोरोनाग्रस्तांची वाढ; एकुण रुग्णसंख्या ९७, ६४८

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेच आहे. आता ही संख्या १ लाखाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर लवकरच आपण लाखांच्या घरात जाऊन बसणार आहोत. आज दिवसभरात राज्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हे चित्र राज्यासाठी खूप चिंताजनक आहे.

एका दिवसात राज्यभरात ३६०७ रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच सर्वाधिक मृत्यूच्या संख्येतही आज वाढ झाली आहे. दिसभरात एकूण १५२ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. याबरोबरच राज्यातील रुग्णसंख्या आता ९७,६४८ झाली आहे. आपण लवकरच १ लाख पार करण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

 

दरम्यान राज्यातील ४६ हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून सरकार सामाजिक अलगाव चे सर्व नियम पाळून मिशन बिगिन अगेन द्वारे पुन्हा राज्यातील कामकाज सुरु करते आहे. सोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे, सॅनिटायझर ने सतत हात धुणे, भौतिक अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असली तरी बरे होणारी रुग्णसंख्याही आशादायी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment