हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शिवसेनेचे नेते तसेच सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची नुकतीच मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून याबाबत माहिती दिली होती. तसेच या मुलाखतीत पवार सर्वच विषयांवर मोकळेपणाने बोलले असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. लवकरच ही मुलाखत सामना मध्ये प्रकाशित होईल असेही त्यांनी सांगितले होते. यावर एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तावर निलेश राणे यांनी खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ असे म्हंटले आहे.
‘शिवसेनेचा पवारांशी ‘सामना’; ‘ही’ मुलाखत देशात खळबळ माजवणार!’ असे ट्विट एका वृत्तपत्राने केले असता त्यावर निलेश राणे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या अंदाजात ट्विट करत उत्तर दिले आहे. ‘खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला. खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही.’ असे ट्विट राणेंनी केले आहे.
खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला. खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही. https://t.co/YKmjKj6nhb
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 7, 2020
सोबतच त्यांनी देशात काय चालू आहे आणि यांचे काय सुरु आहे असा टोमणा देखील मारला आहे. दरम्यान लवकरच राऊत यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलखात प्रकशित होणार आहे. या मुलाखतीची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. शरद पवार हे नेहमीच सर्वांसाठी आकर्षक व्यक्तिमत्व राहिले आहे त्यामुळे या मुलाखतीची चर्चा सुरु आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.