Bihar Election Result 2020: मोदींच्या हनुमानाचा जेडीयूला दणका! चिराग पासवान नितीश कुमारांना बुडवणार?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू (JDU) तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची चिन्हं आहेत. एन बिहार निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची … Read more

केंद्रीय सत्तेला आव्हान देत बिहारमध्ये ‘तेजस्वी’ पर्व सुरू ; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निकालाचे कल हाती आले असून त्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचं चित्रं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी … Read more

कोरोनामुळं कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही, म्हणून अर्णब यांनाही.. – गृहमंत्री देशमुख

मुंबई । कोरोना संकटात कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही. गेली ४ महिने कैदी आपल्या नातेवाईकांना भेटले नाहीत. त्यामुळं अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात भेटता येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. अर्णब गोस्वामींच्या सुरक्षेची चौकशी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटु द्यावे असे ते म्हणाले. त्यावर … Read more

विरोधकांनी केंद्राकडे राज्याला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही- वडेट्टीवार

नागपूर । अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Flood Infected Farmers) आज मदतीचा पहिला टप्पा म्हणून २ हजार २९७ कोटी वितरीत केला. याशिवाय ४ हजार ७०० कोटी आम्ही दिवाळीनंतर (Diwali 2020) देऊ असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी म्हटलंय. तसेच राज्य संकटात असताना विरोधकांनी केंद्राला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही असा टोला … Read more

फडणवीसांचे हायकोर्टाला साकडं; अर्णव गोस्वामीला कोठडीत होत असलेल्या त्रासाची दखल घ्यावी

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या बचावासाठी आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन अर्णव गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. … Read more

पुन्हा झटका! अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; ‘जेल’वारी लांबली

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. कोर्टानं त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तसेच सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर … Read more

राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्येही लक्ष घालतायत याचा आनंद; अर्णब गोस्वामी प्रकरणावर भुजबळांचा टोला

नाशिक । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन … Read more

अखेर ‘त्या’ विधानाबद्दल एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागीतली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असंही खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, … Read more

अर्णब गोस्वामी प्रकरणात राज्यपालांची उडी ; गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन करून अर्णबची सुरक्षा आणि आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप शिवसेनेवर टीका करत आहे. अर्णबच्या अटकेवरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत आता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही उडी घेतली आहे. कोश्यारी … Read more

पंकजा मुंडेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; सेना खासदार हेमंत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार

हिंगोली । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देण्यात आता पुढील नंबर पंकजा मुंडेंचा असल्याचे बोलले जात आहे. खडसेंप्रमाणे पंकजही भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी पंकजा शिवसेनेत प्रवेश करणारा असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. शिवसेना नेते जाणीवपूर्वक पंकजा मुंडेंना पक्षात घेणार असल्याच्या कयासांना खतपाणी घालत आहेत.(Pankaja Munde) अशातच शिवसेनेचे … Read more