मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली क्युरेटिव्ह याचिका

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आज राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 24 जानेवारी रोजी याचिकेसंदर्भात निकाल देण्यात येणार आहे. थोडक्यात, सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीश पुन्हा एकदा मराठा आरक्षण सुधारणा याचिकेवर विचार करणार आहेत. राज्य सरकारने आणि … Read more

महाविकास आघाडीचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या 29 ते 30 डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपा संदर्भात बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात दोन फॉर्मुलांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून … Read more

काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

Sunil Kedar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणांमध्ये ते दोषी आढळल्यामुळे त्यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असणाऱ्या नागपूर जिल्हा बँकेच्या 150 … Read more

राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; चर्चांना उधाण

Raj And Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती चर्चा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये … Read more

ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार; ठाकरेंनी राहुल गांधींशी केली चर्चा

rahul gandhi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपाविषयी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट महाराष्ट्रात 23 जागा लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांकडून देण्यात आले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी देखील चर्चा … Read more

मोठी बातमी! निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळले; लोकसभेत नवं विधेयक मंजूर

Election Commissioner Selection Committee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी लोकसभेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयकास मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडप्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळले जाणार आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडप्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे. आता या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. … Read more

जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी येऊन सभागृहांमध्ये गोंधळ माजवला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच काही खासदारांनी सभागृहात कामकाज सुरू असताना या प्रकरणी गोंधळ देखील घातला. ज्यामुळे संसदेतील अध्यक्षांनी 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे … Read more

उपराष्ट्रपतींची नक्कल करणे खासदाराला पडले महागात! थेट पोलिसात तक्रार दाखल

Jagdip Dhankad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्यामुळे राजकीय वर्तुळात नवा निर्माण झाला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवरच खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या डिफेंन्स कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये एका वकीलाने ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता बॅनर्जी … Read more

ठरलं तर! कंगना रनौत भाजपकडून 2024 लोकसभा निवडणूक लढवणार; वडिलांनी दिली माहिती

Kangana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या सतत करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. तसेच तिने आजवर सामाजिक विषयांवर आणि राजकीय विषयांवर देखील आपले मत मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे कंगना रनौत यंदा लोकसभा निवडणूक लढेल अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण स्वतः कंगनाचे वडील अमरदीप रणावत … Read more

Breaking News: लोकसभेतून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदार निलंबित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांनी आणखी 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. आज विरोधकांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी … Read more