कराड येथील नामांकित रेस्टारंटमध्ये खाद्यपदार्थात झुरळ?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील दत्त चौकात असणार्‍या एका नामंकित रेस्टारंटमध्ये एका ग्राहकांस खाद्यपदार्थात झुरळ सापडल्याचा प्रकार घडला. या रेस्टारंटमध्ये ग्राहकांने अन्न औषधच्या अधिकार्‍यांना त्यासंबधी माहीती दिली, मात्र काही वेळात ग्राहकांने रेस्टारंट चालक नातेवाईक असल्याचे सांगत पळ काढला. तर अन्न औषध विभागाच्या अधिकार्‍यांने रेस्टारंटची तपासणी हा कामाचा भाग असल्याचे सांगत तपासणी केली असल्याचे … Read more

कराडमध्ये प्रीतिसंगमा शेजारीच बेकायदा वाळू उपसा! प्रशासन ढिम्म

जिल्ह्यातील महत्वाचे प्रेरणास्थान असलेल्या कराड येथील प्रीतिसंगमाजवळील कृष्णा नदी पात्रातच बेकायदा वाळू उपसा केला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

कराड परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर छापे, ६ जणांवर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

कराड येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने मलकापूर व ओगलेवाडी परिसरात चार ठिकाणी अवैध जुगार अड्यावर छापे टाकून कारवाई केली आहे. या छाप्यात ६ जणांवर कारवाई करण्यात आली असून ५ हजार ३७६ रूपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ- 

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांक मिळवलेल्या कराड शहरातच स्वच्छतेचा बोजवारा

सातारा प्रतिनिधी| स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळवलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड शहरातच स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच समोर आलं आहे. कराड शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यावरून याठिकाणी रात्री दारूड्यांचा अड्डा झाल्याच स्पष्ट होतं आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्यावरचं प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे कागद पडलेत. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महात्मा … Read more

पृथ्वीराज चव्हाणांना सोडून गेलेले सूर्याजी पिसाळ, शिवराज मोरेंचा आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवाजी महाराजाच्या काळात एक पिसाळ झाला, मात्र आज लोकशाहीच्या काळात कराड दक्षिमध्ये एक सुर्याजी पिसाळ झाला, अरे गेला तर गेला मात्र येथे आमच्याकडे मावळे आहेत, असा टोला नाव न घेता आ. आनंदराव पाटील यांना शिवराज मोरे यांनी मारला. आ. आनंदराव पाटील यांच्यावर कॉग्रेसच्या कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी अत्यंत … Read more

NTS परिक्षेत यशवंत हायस्कुलचे यश

कराड प्रतिनिधी | नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत यशवंत हायस्कुल, कराड येथील ऋषीकेश गंबरे या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे. देश पातळीवर आयोजित करण्यात येणार्‍या नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत गंबरे यांने यश संपादन केल्याने त्याचे कौतुक होत आहे. एन.टी.एस. परिक्षा उत्तीर्ण होऊन गंबरे हे शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. गंबरे यांचा 118 स्कोर झाला असून ओबीसी गटातून … Read more

चिठ्ठीद्वारे निवडला जाणार कराडचा मठाधिपती, वारकरी संप्रदायाच्या बैठकीत निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड गेली 16 महिन्यापासून सुरु असलेला कराडच्या श्री मारुती बुवा कराडकर मठाच्या मठाधिपतीच्या वादाने मठाची नाहक बदनामी झालेली असून मठाच्या भवितव्याचा विचार करीत या वादावर कायमचा पडदा पडावा, यासाठी एकादशीदिवशी क्षेत्र पंढरपूर येथील मारुतीबुवा कराडकर मठात झालेल्या वारकरी संप्रदायाच्या बैठकीत कराडचा मठाधिपती हा चिठ्ठीद्वारे निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे … Read more

मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more