नागपूर-रायगडपर्यंत तरुणांनी सुरू केला सायकलवर प्रवास धाडस ग्रुपच्या युवकांचे स्वागत; सामाजिक विषयांवर जनजागृती

औरंगाबाद | नागपूर ते रायगडपर्यत असा प्रवास सायकलवर प्रवास करणाऱ्या धाडस ग्रुपच्या तरुणांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नागपूर ते रायगड असा प्रवास करण्याचे लक्ष धाडस ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आले आहे. यामध्ये नागपूर- मेहकर-जालना- औरंगाबाद- प्रवारासंगम-पुणे – अहमदनगर मार्गे रायगड असा प्रवास सायकलवर केला जात असून ३१ तारखेला ते … Read more

जि.प. शिक्षकांची 4 कोटींची देयके निधीअभावी धूळखात, देयके कालबाह्य होण्याची शिक्षकांमध्ये भीती

औरंगाबाद | तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 4 कोटींची देयके निधी अभावी धूळखात पडून असून ही देयके न मिळाल्यास देयके कालबाह्य होण्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेवर सुमारे 1250 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी दोनशे ते अडीशे शिक्षक- शिक्षिका यांचे सन 2019 पासूनचे मेडिकल परिपूर्तीचे, अर्जित रजा, दीर्घ मुदतीच्या आजारी रजा, वेतन तफावत फरक … Read more

मावशीकडे राहणाऱ्या मुलीचे अपहरण करून अत्याचार, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाळूज महानगर | १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर पुण्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुध्द बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने ती लहानपणापासून रांजणगाव परिसरात मावशीकडे राहात होती. तिची मावशी व काका हे दोघे १६ मार्चला कामासाठी घराबाहेर पडले होते. घरमालकाने तिच्या मावशीला … Read more

पोलीस ऍक्शन मोड मध्ये; नियम मोडणाऱ्या हॉटेल,सलून, पानटपरी सह टवाळखोरावर गुन्हे दाखल

औरंगाबाद | कोरोनाच्या पर्शवभूमीवर जिल्हा प्रशासनाने ठरविलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या हॉटेल चालक, सलून, पान टपरी, सह विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई करीत थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहरात कोरोनाची स्थिती बघता कडक स्वरूपाचे नियम लागू आहेत. तरी देखील काही भागात हॉटेल, सह विविध दुकाने छुप्या पद्धतीने सुरू आहेत. अशा ठिकाणी … Read more

कोरोनाबरोबरच शहरातील किराणा, औषधी दुकानेही वाढली

औरंगाबाद | कोरोनामुळे शहरातील औषधी दुकानांचा व्यवसायही तेजीत चालला आहे. लॉकडाऊन असो वा नसो औषधी दुकाने सुरूच असतात. यामुळे फार्मसी झालेल्या युवकांनी आपली औषधी दुकाने सुरू केली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आधी शहरात २,२०० औषधी दुकाने होती, त्यात मागील वर्षभरात ७० नवीन औषधी दुकानांची भर पडली आहे. संघटनेचे विनोद लोहाडे यांनी सांगितले … Read more

घाटीत गंभीर रूग्णांसाठी खाटा वाढवा, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या सूचना

औरंगाबाद | घाटीत प्रत्येक गंभीर रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. येथे गंभीर रुग्णांना नाकारले जाते, असे होता कामा नये. घाटीची प्रतिमा मलीन होऊ नये. यासाठी खाटांची संख्या वाढवा. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना मनपाच्या काेविड केअर सेंटरला पाठवा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घाटी प्रशासनाला केली. घाटीत अधिष्ठातांच्या कक्षात … Read more

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार, माजी आमदार सुभाष झांबड यांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे, आता अध्यक्ष पदाबाबत आपण चमत्कार करणार असल्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी बुधवारी सांगितले. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण हे माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्थापन केलेल्या शेतकरी विकास पॅनल बराेबर … Read more

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एकाच बेडवर तीन रुग्ण; बेडअभावी रुग्णांना झोपावे लागते फरशीवर

औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केले आहे. श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं … Read more

कोरोना नियमांचं उल्लंघन, बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिलचा जागृत पेट्रोलपंप प्रशासनाकडून सील…

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडे ९ ते १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

दिलासादायक ! ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, मनपा प्रशासकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती…

औरंगाबाद | शहरातील ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज येणारी रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाचेही धाबे दणाणले आहे. परंतु दुसरीकडे दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण … Read more