करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने हैदोस घातला आहे. असं असतानाही जीवमुठीत घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. ड्युटीवर असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्तवपूर्ण बैठक पार … Read more

कोल्हापूरात २ करोना संशयित रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक करोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शहरातील २ करोना संशयित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. मृतांपैकी एक ३७ वर्षीय तरुण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष करोना कक्षात भरती होता. तर … Read more

एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पुढील सूचना प्राप्त होईपर्यत वेतन न करण्याचे सरकारी आदेश असल्याची माहिती मिळत आहे. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सरकारने आदेश दिले आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळं कमालीची नाराजी आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे म्हणून … Read more

करोनासंबंधी फेक न्यूजला आळा घाला अन्यथा.. – सुप्रीम कोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर … Read more

Breaking । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर

मुंबई । राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईत मागील २४ तासात तब्बल ५९ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत एका दिवसात ७७ रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३०२ वर पोहोचला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज एका दिवसात राज्यात एकुण ७७ कोरोनाचे नवे रुग्ण … Read more

VIDEO: गावकऱ्यांनो घरात राहा! करोनाबाबत आवाहन करताना महिला सरपंचांना अश्रू अनावर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत शासन व्यवस्थेतील सर्व यंत्रणा दिवसरात्र कामाला लागल्या आहेत. लोकांना सहकार्याचं आवाहन करत आहेत. मात्र, अजूनही काही लोक या आवाहनाला प्रतिसाद देतांना दिसत नाही आहेत. असाच काहीसा प्रकार गडहिंग्लज तालुक्यातील महागावमध्ये पाहायला मिळत आहे. नोकरी निम्मिताने मुंबईत असलेले काही नागरिक लॉकडाऊनमुळे गावात परतले … Read more

इटलीनंतर स्पेनमध्ये करोनाचा प्रकोप! २४ तासांत ९१३ बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात करोनाने हैदोस घातला आहेत. अनेक देशांना विनाशाच्या वाटेवर आहेत. करोनाच्या प्रकोपाने युरोपातील स्पेनमध्ये हाहाकार माजला आहे. गेल्या २४ तासांत ९१३ जणांचे मृत्यू स्पेनमध्ये झाले आहेत. यामुळे स्पेनमध्ये करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोचली आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये २५ हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती … Read more

राज्यातील करोना बाधितांचा आकडा २२० वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशावर करोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. राज्यात करोना बाधितांच्या संख्येत आजही भर पडली. राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता २२० झाला आहे. आज दिवसभरात १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर २ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या ३९ जणांना … Read more

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना संक्रमितांचा आकडा वाढतोय आहे. राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर पोहोचला आहे. १२ तासात १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर १ आणि नाशिकमध्ये १ नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली असून महाराष्ट्रात एकूण २०७ कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात आणखी २ कोरोना … Read more

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं अमेरिकेतील परिस्थिती किती भयावह आहे, याचा अंदाज तेथील प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांच्या वक्तव्यावरून लावता येऊ शकतो. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ ते २ लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती डॉ. फाऊची यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसात अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. याचे … Read more