महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी २६ मार्चला मतदान; भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळं राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय … Read more

शिवसेनेशी आमचं अजूनही भावनिक नातं कायम- चंद्रकांत पाटील

सांगली प्रतिनिधी । दोन भाऊ भांडून वेगळे रहात असले तरी शिवसेनेशी भावनिक नाते कायम आहे. त्यामुळे भविष्यकाळात भाजप-शिवसेना एकत्र येतील का? की येणार नाही, हे काळच ठरवेल, असं विधान मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाविकास आघाडीने आमच्या कारभाराच्या चौकशीची भिती दाखवू नये, चौकशीला आम्ही घाबरत नाही, चौकशी करा पण त्याचा तत्काळ अहवाल सादर … Read more

महाविकास आघाडी लोकाभिमुख योजना राबवित आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्या!-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील सर्व नागरीकांसाठी लोकाभिमुख योजना राबवित आहे या योजनेचा लाभ सर्व सामान्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातंर्गत गंजगोलाई लातूर येथील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर … Read more

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांना सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलं आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. यांवर मुख्यमंत्री … Read more

२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत राज्यातील सरकार अस्तित्वात आणलं. असं तिन्ही पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सांगत आले आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेत यश मिळालेल्या महाविकास आघाडीने … Read more

परभणी जि.प.च्या विषय समिती सभापतीपदावरही महाविकास आघाडीचा ताबा

राज्यातील सत्तेमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीरित्या राबविल्यानंतर, परभणी जिल्हा परिषदेमध्ये ही घटक पक्षांनी सत्ता ताब्यात घेत, काही दिवसांपूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीने काँग्रेसने बिनविरोध मिळवले. त्यानंतर आता शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समितीच्या सभापतीपद निवडीतही महाविकास आघाडीने ताबा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे बांधकाम, अर्थ आणि पशुसंवर्धन असे तीन सभापती पदे मिळवली. तर घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला महिला आणि बालविकास सभापती पद देण्यात आल आहे.

कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका असल्यास मंत्रालयातील या नंबरवर संपर्क साधा

टीम हॅलो महाराष्ट्र | महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. लवकरच या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्यास सुरू होईल. या योजनेविषयी शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या शंकांच निरसन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दूरध्वनी क्रमांक जाहीर केला आहे. या दूरध्वनी द्वारे शेतकऱ्यांना या योजनेविषयीची माहिती दिली जाणार आहे. मंत्रालय स्तरावर हा संपर्क कक्ष सुरू राहणार आहे. … Read more

वजनदार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांच्या गळ्यात 500 किलोचा हार

हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार करताना त्यांना ५०० किलोचा हार घालण्यात आला.

राजू शेट्टींनी व्यक्त केली राज्याचे कृषीमंत्री होण्याची इच्छा, मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळेल का?

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सह पक्षांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत.

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन राऊत

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.