कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार? ‘भाजपा-सेने’साठी धोक्याची घंटा !

विधानसभेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वही १० जागांसाठी अत्यंत अटीतटीचे सामने आहेत. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असताना हळूहळू कल स्पष्ट होऊ लागला आहे. त्यानुसार आठ जागा लढविणारी शिवसेना जिल्ह्यात ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे तसेच दोनच जागा लढविणाऱ्या मित्रपक्ष ‘भाजपा’च्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात कोरी पाटी राहिलेल्या काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाने यावेळी खाते उघडण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावून टक्कर देण्याचे ठरवले आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांनी लक्षवेधी हवा निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकत अब्रू राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावली आहे.

अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहे

सांगली जिल्ह्यातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळली आहे,यामुळे या ‘नेत्यांनी’ संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहेत असा आरोप भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद पाडून राज्यातील जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, आमचा पक्ष तुमच्यासाठी कार्य करेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उमरगा  येथील सभेत केले.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘पोस्टल मतदान’ प्रक्रिया सुरू

विधानसभेसाठी कोल्हापुरातील शासकीय कर्मचारी, पोलीस,होमगार्ड,सुरक्षारक्षक यांच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. कोल्हापूरातील दहाही मतदान केंद्रासाठी हे मतदान झाले. सकाळी ११ ते ५ ही या मतदानाची वेळ होती. बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले असून पोस्टल मते म्हणून ते नोंदवण्यात आले आहेत.

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा. अशी युक्ती लढवली आहे.

निवडणूक म्हणजे ‘हमखास रोजगार योजना’; घर सांभाळून महिलांचा रोजंदारीवर प्रचार

महिलांचे विश्व आता केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केव्हाच घराचा उंबरठा ओलांडून आकाशाला कवेत घेतले आहे. सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या महिलांनी राजकीय क्षेत्रातही आश्वासक पावले टाकल्याची किती तरी उदाहरणे आहेत. राजकारण हा मध्यमवर्गीयांचा विषय नाही ही समजूतही आता कालबाह्य झाली आहे. याउलट बहुतांश निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका घेणाऱ्या महिलाही आता निवडणुकांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, हा प्रचार केवळ आपल्या नेत्याच्या विजयाकरिता करण्यापुरता मर्यादित राहिला नाही आहे. तर निवडणूक दरम्यान दोन पैसे कमावता येऊन पोटाची खडगी भरता येईल हे ही त्यामागचे एक कटू सत्य आहे.

‘मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नाही’ – चंद्रकांत पाटील

‘निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. निवडणूक लढवीत असलो तरी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा मला नाही,’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.

राजीव सातव यांचे खंदे समर्थक गंगाधर पाटील चाभरेकर शिवबंधनात

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले राजीव सातव यांना मोठा धक्का बसलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघातून विधानसभेसाठी ईच्छुक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले.