मला चंपा म्हणणं थांबवा, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील प्रचारसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख पुन्हा एकदा चंपा असा केल्याने चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत अजित पवारांना इशारा दिला आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं … Read more

ठाकरे सरकार कधी व कसं पडणार हे अजितदादांना चांगलं ठाऊक आहे: चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित असून तो कधी होणार हे अजित पवार यांना चांगलं ठाऊक आहे. ठाकरे सरकार कधी आणि कस पडणार हेही अजितदादांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. विझण्यापूर्वी दिवा जसा मोठा होता, त्याप्रमाणे सध्या महाविकासआघाडीची फडफड सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. … Read more

चंद्रकांत पाटील म्हणजे मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस: अजित पवारांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी अजित … Read more

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय ; अजितदादांनी फडणवीसांना फटकारले

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. काल फडणवीस यांनी त्यांच्या सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्याचा … Read more

कोरोना संदर्भात महत्त्वाची बैठक सुरु, अजित पवार, राजेश टोपे उपस्थित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक पार पडल्यानंतर आताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक सुरु झाली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणी करावी, विद्युत शवदाहिनी उभारून ती कार्यान्वित करावी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्यात यावेत तसेच कोरोना आदी महत्वाच्या विषयावर … Read more

राज्यासाठी जो निर्णय असेल, तो पुण्यासाठी नको, अजित पवारांची भूमिका

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यासाठी जो निर्णय असेल तो घ्या, आमचा पाठिंबा राहिल. मात्र, राज्यासाठी जो निर्णय घ्याल, तो पुण्याला लागू करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या … Read more

आमदार निधीत कपात करा, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आमदारांचा विकासनिधी 2 कोटीने कमी करावा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्यावे. कठोर निर्बंध आणि जगणं यात समन्वय साधला गेला पाहिजे. त्यासाठी आमदारांचा निधी कमी करावा व कामगारांना न्याय द्यावा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय … Read more

BREKING NEWS : राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : उद्धव ठाकरे पहा लाईव्ह अपडेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी, अध्याप 1200मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता, रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे. त्यामुळे लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आम्ही कुठे कमी पडतो आहे का ? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत … Read more

पुण्यातील ससुन रुग्णालयाला ५०० बेड्स मिळणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही. राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी जेवढ्या लसी … Read more

अजित पवार, जयंत पाटलांवर गुन्हे दाखल करा : चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडून कोरोनाचे नियम डावलून पंढरपूरमध्ये मोठमोठ्या सभा घेतलया जात आहेत. या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाढत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी … Read more