भाजपचीचं आमच्या संपर्कात; फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार; बच्चू कडूंचा दावा

अमरावती । राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. दरम्यान,महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेते सांगत असताना भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. … Read more

ईदला बकऱ्यांची कुर्बानी देण्याऐवजी आपल्या मुलांची कुर्बानी द्या! भाजपा आमदाराचं बेताल वक्तव्य

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी बकरी ईदला कुर्बानी देण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. जर कुर्बानी द्यायचीच असेल आपल्या मुलांची द्या,” असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी लोनी येथे कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दैनिक लोकसत्ताने याबाबतचे … Read more

भाजपचे बरेच आमदार आमच्या संपर्कात, नावं कळली तर राज्यात भूकंप होईल- यशोमती ठाकूर

अमरावती । भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असून उलट भाजपचेचं आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा … Read more

… म्हणून विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा! भाजप आमदाराची मागणी

मुंबई । अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसीरिजमुळे अनुष्कावर भापप नेत्याची प्रतिमा खराब करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्काविरोधात तक्रार नोंदवली आहे. नंदकिशोर यांच्यामते, ‘पाताल लोक’ वेबसीरिजमधून अनुष्का पाकिस्तानची प्रतिमा सुधारू पाहत आहे. एका मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीने … Read more

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेला निधी परत द्या, भाजप आमदाराची अजब मागणी

उत्तर प्रदेश । संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनामुळे देशाला अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे. कोरोनाशी लढताना संसाधन अपुरी पडत असताना अनेकजणांनी आर्थिक मदत सरकारला देऊ केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील भाजप आमदार श्याम प्रकाश यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेला निधी परत म्हणून थेट जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे. आमदार … Read more

VIP संस्कृती! लेकीला घरी आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये भाजप आमदाराचा कारने २ हजार किमीचा प्रवास

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये सर्व वाहतूक बंद असल्याचा फटका लाखो स्थलांतरित मजुरांना बसला. अनेक मजूर कल्पना येण्याच्या आत देशातील विविध शहरांमध्ये उपाशीपोटी राहण्यास मजबूर झाले. यांतील बहुसंख्य लाखो मजूर बिहार आणि उत्तरप्रदेश मधील आहेत. या मजुरांनी वारंवार विनवण्या करूनही दोन्ही राज्यांच्या सरकारांनी लॉकडाऊन आणि कोरोनासंसर्गाच्या धोक्यामुळं त्यांना घरी आणण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान, अशा सर्व परिस्थितीत … Read more

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न; मुख्यमंत्री येडियुरप्पांची हजेरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत आहे. कोरोनाचे संकट आणखी वाढू नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन मोदी यांनी केलं होतं. पण, भाजपा आमदारानेच लॉकडाउनच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. कळस म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये … Read more

भाजप आमदार मंगलप्रभात लोढा देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर,संपत्ती जाणून घेतल्यास व्हाल थक्क!

भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. लोढा व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१,९६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यंदाच्या चालू वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे.

पाणी प्रश्नावर, भाजप आमदाराने शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला

अहमदनगर प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक जवळ आल्याने नेवासा मतदार संघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. मतदार संघातील गावांना भेटी देऊन त्यांनी निववडणूक पूर्व प्रचार सुरु केला आहे. दरम्यान या दौऱ्यात अनेक मतदार आमदारांना आपल्या समस्या सांगताना दिसत आहेत. मात्र मुरकुटेंचा दौरा सुकली गावात पोहचला असतांना स्वागतासाठी उभ्या असलेल्या गावातील नागरिकांनी आमचा पाण्याचा … Read more