मुंबईत एकाच दिवसात आढळले २१८ करोना रुग्ण,कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर

मुंबई । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने … Read more

Don’t Worry! भारताकडे ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स

नवी दिल्ली । भारताकडे कोरोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सचा पुष्कळ साठा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. भारताकडे सध्या तब्बल ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स आहेत. तर भारताची सध्याची गरज १ कोटी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सची आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत … Read more

वाधवान कुटुंबाला पकडून ठेवा, सीबीआयची सातारा प्रशासनाला सूचना

मुंबई । बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान कुटुंब लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रवासात त्यांना कोणीही अडवलं नाही. कारण राज्याचे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला आलिशान गाडीतून प्रवास केला. या पत्रात गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाचा उल्लेख ‘फॅमिली फ्रेंड’ असा केल्याने एकच खळबळ माजली होती. काल दिवसभर … Read more

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारुग्ण! जाणून घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वात वाईट झाली आहे. राज्यात १३६४ संसर्ग झालेल्या प्रकरणांची पुष्टी झाली आहेत,ज्यामध्ये १९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत ६८७६ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. राज्यात उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाणही खूप कमी आहे. आतापर्यंत केवळ १२५ रुग्णच बरे झाले आहेत. राज्यात दर तासाला संक्रमित लोकांची … Read more

Breaking | धक्कादायक! पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू

पुणे । पुण्यातील ससून रुग्णालयात एका २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आजसकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्यातील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ ५० वर्षांवरील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, आता … Read more

१३० कोटींच्या देशात पुरेसे डॉक्टर आणि नर्सेस आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोना व्हायरस जगभर पसरला. करोनाने बलाढ्य म्हणून टिमगी मिरवणाऱ्या देशांना गुडघे टेकायला लावले. संपूर्ण जग कोरोनाशी लढाई लढत आहे. ते म्हणजे केसाच्या ९०० वा भाग इतका आकार असलेल्या एका विषाणूंसोबत. या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी एक सैन्य जगभर दिवस रात्र काम करत आहे. हे सैन्य म्हणजे असंख्य डॉक्टर्स, नर्सेस, … Read more

पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण; वाढत्या संख्यने स्थिती चिंताजनक

पुणे । मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईनंतर पुणे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनलं आहे. आज पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे … Read more

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; जाणून घ्या आजची स्थिती

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली होती. मात्र आज १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. … Read more

हुश्श..! पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज

पुणे । करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत भर टाकत आहे. या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे … Read more

लॉकडाउनचा चोरांनाही बसला फटका; ना घरफोडी, ना चेन स्नॅचिंग, ना मोबाईल चोरी…

मुंबई । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाउन आहे. मुंबई म्हणजे गर्दीच शहर ही या मुंबापुरीची ओळख. मात्र, लॉकडाउन लागू झाला आणि मुंबई एकाएक थांबली. लॉकडाउनमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. या सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाउन असल्यानं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात … Read more