अहो आश्चर्यम् ! नगरपंचायतीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळाले चक्क शून्य मत

औरंगाबाद – काल राज्यात पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक जण एका मताने निवडून आले, तर अनेक उमेदवारांना एका मताने पराभव पत्करावा लागला. एवढेच काय तर मोठ्या राजकीय नेत्यांच्या पॅनलचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याचे आपण पाहिले. आता याहीपेक्षा कहर म्हणजे बीडच्या शिरूर नगरपंचायतमध्ये चक्क काँग्रेसच्या एका उमेदवाराला शून्य मत मिळालं आहे. फकीर शब्बीर बाबू असं या … Read more

“खच्चीकरण करून राष्ट्रवादीचे बळ वाढवायची युती सेनेच्या काही नेत्यांनी केली”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल राज्याच्या 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले. या निकालानंतर शिवसेना नेते रामदास कदम याचे पुत्र योगेश कदम यांनी नाराजी व्यक्त केली. “शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि … Read more

नगरपंचायत निवडणुक: मराठवाड्यात काठावर फुलले ‘कमळ’ !

BJP Flag

औरंगाबाद – मराठवाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत काठावर का होईना कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. 23 पैकी सर्वाधिक 6 नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे 5, शिवसेनाकडे 4, काँग्रेस 3 तर बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका नगरपंचायत स्थानिक आघाडीने यश मिळवले. उर्वरित ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील एकूण 391 पैकी सर्वाधिक … Read more

बीडमध्ये तीन नगरपंचायतीवर भाजपचे ‘कमळ’; तर राष्ट्रवादीचे मातब्बर पराभूत

BJP NCP Logo

बीड – जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीचे निकाल आज सकाळी जाहीर झाले. यात वडवणी, केजमध्ये सत्तांतर झाले आहे. आष्टी, पाटोदा, शिरूरकासारमध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे. वडवणीत राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांमुळे सत्तांतर झाले आहे. केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने बहुमत मिळवत सत्ताधारी काँग्रेसला धक्का दिला आहे. निकालात जिल्ह्यात मातब्बरांना धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे … Read more

सोयगाव नगरपंचायतीवर सत्तारांचे वर्चस्व

औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीसाठी आज बुधवारी मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण चार जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मतमोजणीनुसार 11 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बाजी मारली असून तर भाजपने सहा जागांवर विजय मिळविला आहे. अशा एकूण 17 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री … Read more

महाविकास आघाडी तोडण्याचे काम राष्ट्रवादीने केले, शिवसेना- काॅंग्रेस एकत्र : आ. महेश शिंदे

सातारा | सातारा जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्षाने महाविकास आघाडी तोडण्याचे काम केले. जिल्हा बॅंकेत आम्ही त्यांना दोन जागा मागितल्या होत्या, परंतु त्यांनी आम्हांला जाणीवपूर्वक डावललं. तरीही शिवसेनेच्या तीन जागा आल्या. राष्ट्रवादी जिल्ह्यात केवळ त्याच्या फायद्याच्या ठिकाणी आम्हांला घेणार असतील तर आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना घ्यायचा प्रश्नच येत नाही. आम्ही काॅंग्रेसला घेवून चाललो … Read more

बिनविरोध निवड : भावाची साथ… बहिणीची बाजी अन् शिवसेनेचा झेंडा फडकला

दहिवडी | नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या सुरेखा पखाले या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. सातारा जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक व शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांची साथ अन् बहिणीची नगरसेविका पदाची बाजी मारली अन् शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. दहिवडी नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागांची निवडणूक झाली असून आता 4 जागांची निवडणूक प्रक्रिया सुरु … Read more

5 राज्यांतील निवडणूकीच्या तारखा जाहीर; पहा कधी होणार निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील ५ राज्याच्या निवडणुकीबाबत घोषणा केली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब , मणिपूर , गोवा आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे . उत्तर प्रदेश आणि मणिपूर निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून पंजाब, उत्तरखंड आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक घेण्यात … Read more

पाटण नगरपंचयात निवडणूक : सोमवारी चित्र स्पष्ट होणार, छाननीत 36 अर्ज वैध

Patan Nagerpanchayt

पाटण | पाटण नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी दाखल झालेल्या 42 उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी शांततेत पार पडली. यामध्ये 6 अर्ज अवैध आणि 36 अर्ज वैध ठरले आहेत. यानंतर 10 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील गाढे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायत मुख्याधिकारी … Read more

महादेव जानकरांची मोठी घोषणा; ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून कोण कोण निवडणुका लढवणार हे निश्चित झालेले नाही. अशात आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातून लढणार असल्याचे जाणकाराने म्हंटले आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांच्याकडून … Read more