सरकारला मजबूत विरोधक असतील तर लोकशाही टिकते : डाॅ. प्रतिभाताई पाटील

सातारा | राजकारणात विकासकामांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. एक मजबूत सरकार असणं आणि त्याला विधायक, मजबूत विरोधक असतील तरच लोकशाही टिकू शकते, असे वक्तव्य माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सातारा येथे केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सातारा येथे शासकीय विश्रामगृहात काहीकाळ थांबल्या होत्या. यावेळी भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत … Read more

शेतकऱ्यांनी चिंता करू नये; जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. दरम्यान आज रविवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद … Read more

मराठवाड्यातील शाळांचे रुपडे पालटणार ! शाळांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी सरकारकडून 200 कोटी

औरंगाबाद – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी महत्वाची योजना जाहीर केली आहे. स्वराज्यजननी, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ही योजना प्रामुख्यानं मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीस प्राधान्य देणारी आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट द्वारे … Read more

शाळांच्या फी वाढीसंदर्भात तुर्त कारवाई करु नका; औरंगाबाद खंडपीठाने दिले आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शासनाने इंग्रजी शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने याचिका विरुद्ध तूर्तास कारवाई करू नये, तसेच थकित फी भरू शकत नसल्याच्या कारणावरून याचिकाकर्त्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये. त्यांना परीक्षा देण्यास प्रतिबंध करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एम. लड्डा यांनी … Read more

कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील : शरद पवार

फलटण | कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या जमिनीबाबत काही समस्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. याबाबत लवकरच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा करून आगामी काळात प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयास भेट देऊन या महाविद्यालयांच्या कामकाजाची शरद … Read more

मराठवाड्यात खांदेपालट; विभागातून 26 जणांच्या बदल्या

vibhagiy ayukt karyalay

औरंगाबाद | शासनाने मराठवाडा विभागात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या 26 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहे. याच औरंगाबाद निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर अंबड येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची शासनाने बदली केली. या पदावरील संजीव जाधवर यांची बदली पालघर येथे उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे. उपजिल्हाधिकारी रिता मैत्रे वार यांची बदली विशेष भूसंपादन … Read more

जावलीतील अतिवृष्टीत मृत पावलेल्या वारसांना शासनाकडून मदतीचा धनादेश सुपूर्द

जावली | रेंगडी (ता. जावली) येथील चार व वाटंबे येथील एक असे 5 जण केळघर घाटातील ओढ्याला आलेल्या पुरातुन वाहुन गेले होते. यामध्ये पाचही जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे शासनाच्या वतीने या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाचा मदतीचा धनादेश सपुर्द करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडुन लवकरात लवकर मदत मिळावी म्हणुन सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे … Read more

बंधाऱ्याच्या कोट्यवधीच्या अनियमिततेबाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी-उच्च न्यायालयाचे आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाला जिंतूर आणि सेलू तालुक्यातील 35 कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामातील कोट्यावधींच्या अनियमितते बाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी शासनाला दिले आहे. याबाबत शासनाने कुठलाही विलंब करु नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. चौकशी समिती टाळाटाळ करत … Read more

बंडातात्या कराडकरांना अटक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; विलासबाबा जवळ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 20 जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. पंढरपूर येथे यंदा आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने काही नियमावली जारी केली आहे. काही मोजक्या वारकरी भाविकांना पंढरपुरात वारीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावरून व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने 500 वारकरी यांच्या मर्यादेवर पायी वारीचा निर्णय घेऊन … Read more

राहूल गांधीच्या बोलण्यात तथ्य आणि दम असतो, सरकारने गांभीर्याने घ्यावे : संजय राऊत

rahul gandhi sanjay raut

मुंबई | राहूल गांधी याच्या बोलण्यात एक तथ्य असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दम असतो, सरकारला त्या गोष्टीवर निर्णय घ्यावे लागलेले आहेत. तेव्हा ते काही बोलले असतील ते सरकारला गांभीर्याने घ्यावे लागेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राहूल गांधी यांनी केंद्राला लसीकरणांबाबत सूचना केल्या होत्या, आताही काही सूचना केल्या आहेत. या प्रश्नावर … Read more