चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

मित्रपक्षांचा गेम करत भाजपने बळकावल्या परभणीतील २ जागा; ४ मतदारसंघात ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

अकोल्यात दिव्यांगांची अनोखी मतदार जनजागृती रॅली

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

फुलंब्रीमध्ये मुस्लिम मतांचं सेटिंग, काँग्रेसला मदत केल्याचा इम्तियाज जलीलांवर गंभीर आरोप

फुलंब्री मतदारसंघात एमआयएमकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिलावर बेग यांनी इम्तियाज जलील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे.

लातूरमधील देशमुखी कायम राहणार का? अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती

दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?? प्रतिज्ञापत्रात सापडली ‘ही’ गंभीर चूक 

निवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा शड्डू; जिजाऊची ‘ही’ लेक लढणार कोथरुडमधून

मेधा कुलकर्णींना तिकीट नाकारलं जाणं हा महिला वर्गाचा अपमान समजून संभाजी ब्रिगेडने सोनाली ससाणे यांना चंद्रकांत पाटील यांच्यसरोधात उमेदवारी दिली आहे.