पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात कार अडकली, एका महिलेचा मृत्यू, दोघेजण बचावले तर एका बालकाचा शोध सुरू

हिंगोली : काल रात्री 11 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे, नदी नाल्यांना पूर आला. या पुरात औंढा नागनाथ तालुक्यातील असोला नजीक असलेल्या ओढ्यात एक कार काही अंतरावर वाहून गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघेजण बचावले तर एका बालकाचा शोध सुरू आहे. पाण्याचा अंदाज चालकाला … Read more

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी अंदाजे 8-30 ते 8-36 या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळ सकाळी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वेळासाठी नागरिकांत संभ्रमाचे वातावरण पसरले होते. आज गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा , इंजनगाव , म्हातारगाव, महागाव … Read more

युवकांना नोकरीचे आमिष दाखवून 5 ते 10 लाखांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हिंगोली | महाराष्ट्रामध्ये दहा तर उत्तर प्रदेशात नोकरीसाठी आरोपीने तरुणांकडून पाच लाख उकळणाऱ्याला हिंगोली पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींकडून आता हळूहळू माहिती समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीला लावण्यासाठी ५ ते १० लाख रुपये, त्याचबरोबर उत्तर प्रदेशात ८० हजार ते ५ लाख रुपये उकळले जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यामध्ये … Read more

महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून नातेवाईकांना पाठवले त्याचे अश्लील फोटो,सहकाऱ्यावर गुन्हा दाखल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – एका कंपनीत आपली सहकारी असलेल्या महिलेचे अश्लील फोटो काढून ते तिच्या नातेवाईकांला पाठवून तिची बदनामी करण्यात आली. या प्रकारामुळे त्या तरुणाविरोधात कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सर्वप्रथम त्या तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर त्या मुलीच्या संमतीशिवाय तिचे अश्लील फोटो काढले आणि हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवत तिची … Read more

कोरोनाचा काळ आणि लग्नदेखील जमत नाही ! ‘या’ नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जणांना आपले काम सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना नैराश्य येत आहे. या नैराश्यातून हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा या ठिकाणी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच त्याचे लग्नसुद्धा जमत नव्हते. रविवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी … Read more

प्रेमी युगुलाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; घरच्यांकडून लग्नास विरोध झाल्याने उचलले पाऊल

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी गावात एका प्रेमी युगुलाने शेतात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडाकीस आली आहे. आज शुक्रावरी (9एप्रिल) सकाळी शेतात एका तरुण आणि तरुणीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, अजय डुकरे वय (16), आणि सरस्‍वती कराले वय (18) यांच्यात प्रेमसंबंध होते. नुकतेच सरस्वती चे लग्न ठरले होते. … Read more

तब्बल वीस तासांनी सापडला मृतदेह; मृतदेह सापडताच नातेवाईकांनी फोडला हंबरडा

death

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये दि. १ एप्रिल रोजी दहा वर्षीय मुलगा पोहताना वाहून गेला होता. कालव्याला भरपूर पाणी व प्रवाह वेगवान आसल्यामुळे गावकरी व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर लहानग्याचा मृतदेह तब्बल २० तासानंतर दि.२ एप्रिल रोजी पहाटे सापडला. परंतु मृतदेह दिसताच नातेवाईकांनी जोरात हंबरडा फोडला. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी … Read more

वंचितने दिला ‘फॉरेन रिटर्न’ उच्चशिक्षित महिला उमेदवार; मतदारांनी दिले पॅनलला भरघोस मतदान

हिंगोली । हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे ९ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या स्वीडनमधून पॉलिटिकल सायन्समधील पीएचडी प्राप्त उमेदवार होत्या. मतदारांनी प्रस्थापित पक्षांचे उमेदवार डावलून डॉ. चित्रा यांच्यासह त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले असून ८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. … Read more

अरे बापरे! हिंगोलीत एकाच दिवसात २५ SRPF जवान कोरोना पॉझिटिव्ह

हिंगोली । हिंगोली जिल्ह्यात एसआरपीएफच्या आणखी २५ जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं येथील रुग्णांची संख्या ४६ वर पोहोचली आहे. हिंगोलीत आतापर्यंत ४७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी ४१ हे एसआरपीएफचे जवान आहेत. याआधीही मुंबई, मालेगाव व जालन्याहून हिंगोलीत परतलेल्या एकूण १६ जवानांना करोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यात आता २५ जवानांची भर पडली आहे. दरम्यान, … Read more

औषध आणायला गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यालाच पोलिसांची बेदम मारहाण!

हिंगोली प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी देशभरात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. राज्यातही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व जिल्हे सील केले असून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आता पोलिस प्रशासनावर आहे. स्वत: चा जीव धोक्यात घालून पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र राज्यातील काही भागांत पोलिसांकडून विनाकारण … Read more