जोडप्याने शेयर केला ‘असा’ फोटो कि न्यायालयाने ठोठावली तब्बल १६ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणमधील सोशल मीडिया एनफ्लूएंसर आणि जिमचा मालक अहमद मोईन शिराझी याला पत्नी शबनम शाह रोखीसह १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय ७४ चाबूक मारण्याचीही शिक्षा झाली आहे. या संदर्भात शिराजी यांनी अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की आम्हां दोघ जोडीदारांवर सरकारविरूद्ध अपप्रचार करण्यासह सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केल्याचा … Read more

एका अफवेमुळे इराणमध्ये ५ हजार जणांनी पिले इंडस्ट्रियल अल्कोहोल; ७२८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण सरकारने आता कबूल केले आहे की हजारो लोकांनी अफवेमुळे इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले आणि त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणमध्ये एक अफवा पसरली की मद्यपान केल्यामुळे कोरोनाव्हायरस बरा होतो,त्यानंतर शेकडो मुलांसह हजारो लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल पिले. इराण सरकारने सोमवारी सांगितले की या घटनेत एकूण ७२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या … Read more

WHO च्या निधी रोखण्यावर इराणचा अमेरिकेवर हल्ला;लोकांना मरू देणं ही अमेरिकेची जुनीच सवय आहे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबविण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला इराणने लाजिरवाणे म्हटले आहे. अमेरिकेच्या निर्बंधाला अर्थसहाय्य देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाची तुलना करताना इराण म्हणाले की, अमेरिका कसे लोकांचा खून करते हे जग पहात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोनाच्या तीव्रतेची माहिती जगापासून महामारी होईपर्यंत लपवून … Read more

अमेरिकेने हिज्बुल्ला कमांडरला पकडण्यासाठी जाहीर केले दहा लाख डॉलर्सचे बक्षीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लेबनीज हेझबुल्लाचा कमांडर मुहम्मद कावथरानी याच्या गतिविधी,नेटवर्क आणि सहयोगीविषयी कोणत्याही माहिती देण्याऱ्यासाठी अमेरिकेने दहा दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. इराकमधील इराण समर्थीत गटांचे संयोजन करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप या कमांडरवर आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शुक्रवारी दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इराकमधील निमलष्करी गटांचे राजकीय समन्वय सांभाळणाऱ्या काथारानी इराकमधील … Read more

जगभरात कोरोनामुळे आत्तापर्यंत ४७ हजार जणांचा मृत्यू! कोणत्या देशात किती बळी पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ८८४ लोकांचा मृत्यू झाला आहे.स्पेनमध्ये कोरोनाचा दहा लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.संपूर्ण जग कोरोनामुळे अस्वस्थ झाले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जगभरात एकूण ९,३५,८१७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४७,२३१ लोकांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेत आतापर्यंत ४९६० लोकांचा मृत्यू झाला असून एकूण २,१६,५१५ लोकांना कोरोनाची … Read more

स्वदेशी आंदोलकांवर इराण पोलिसांचा गोळीबार, विमान पाडल्याचे देशभर पडसाद

इराण सरकारने चुकून युक्रेन विमान पाडल्याची कबुली दिल्यानंतर लोक निषेधासाठी रस्त्यावर उतरले. इराण सुरुवातीला या अपघाताची जबाबदारी घ्यायला टाळाटाळ करीत होता, परंतु आंतरराष्ट्रीय दबावानंतर ती जबाबदारी इराणला स्वीकारावी लागली.

इराक-अमेरिका संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर; ३५० अंकांची घसरण

इराकने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला आहे. त्यामुळं इराक-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर सुद्धा पडताना दिसत आहेत. आज बुधवारी सकाळी आशियातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने बाजार उघडताच ३५० अंकांची घसरण झाली. सध्या तो १८० अंकांच्या घसरणीसह ४०६९० अंकांवर आहे.

अमेरिकेच्या दोन हवाई तळांवर इराणने केला प्रतिहल्ला;डागली १२ क्षेपणास्त्रे

इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दोन लष्करी हवाईतळावर इराणने हल्ला केला आहे. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आलं आहे.

इराणमध्ये युक्रेनचं विमान दुर्घटनाग्रस्त;१८० प्रवाशांचा मृत्यू

इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व १८० प्रवासी मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. युक्रेन एअरलाइन्सच्या बोईंग ७३७ या विमानाने उड्डाण घेताच ते दुर्घटनाग्रस्त झालं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तविला जात आहेत.

अमेरिका-इराण तणावाच्या स्थितीत मोदींनी केला ट्रम्प यांना फोन

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.