देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार

राज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.

पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

राणेंच्या पाठीमागं शिवसेना हात धुवून, कणकवलीत दिला ‘हा’ उमेदवार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने पक्षात प्रवेश दिला. त्यातच नितेश यांना भाजपने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या या निर्णयाला शिवसेनेने आपला उमेदवार कणकवली निवडणूक रिंगणात उतरवून आपला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने … Read more

बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंना दगाफटका बसणार का? उमेदवारी अर्ज भरताना शिवसैनिक अनुपस्थित 

मुंबई प्रतिनिधी। नवी मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसा आधी मंदा म्हात्रे यांनी आपला अर्ज भरला. यावेळी भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच गणेश नाईक व कुटुंबीय उपस्थिती होते. राज्यात युती होणार याबाबतीत एकमत झालेलं असताना मंदा म्हात्रेंच्या निवडणूक अर्जाची पूर्तता करतेवेळी शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला. नवी मुंबईतील मतदारसंघात शिवसेनेला जागा न … Read more

बाळासाहेब थोरातां विरोधात नवलेंना उमेदवारी; विखेंनी केली मोर्चे बांधणी

अहमदनगर प्रतिनिधी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरले आहे. नवलेंना सेनेकडून बुधवारी सायंकाळी संगमनेर विधानसभा जागेसाठी एबी फॉर्म दिला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून युतीकडून सक्षम उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती. अनेक नावांवर चर्चा झाली … Read more

निवडणूक आयोगाने लोकप्रिय ‘लुडो’ चिन्हाचा समावेश करत विधानसभेसाठी 197 चिन्ह दिली

मुंबई प्रतिनिधी। निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्‍चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हाला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने … Read more

चांद्रयान २ तांत्रिक अडचणींमुळं अडलं, आदित्य ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदावर पोहचतीलच – संजय राऊत

काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चंद्रावर पोहचू शकले नाही, मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, येणाऱ्या २१ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर जरूर पोहचतील – संजय राऊत

सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी – आ. जयंत पाटील

Jayant Patil NCP

मुंबई | बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राज्यात आले खरे परंतू त्यासाठी घेतलेले कर्ज आता आपल्या राज्याच्या माथ्यावर आदळणार आहे तेव्हा सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी असे वक्तव्य करत विधिमंडळ गटनेते आ.जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या … Read more