पंढरपुरातील साडेतीनशे मठ 2 महिन्यांसाठी बंद; पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

सोलापूर प्रतिनिधी | आषाढी एकादशी साठी आता पंढरपूरातील मठ, धर्मशाळा येथे वास्तव्य करण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. कोरोना चा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. जर कोणी आढळले तर त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता पंढरपूरात भाविकानी येऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आषाढी एकादशी १ जुलै … Read more

आषाढी वारी बाबत अजित पवारांची बैठक; विश्वस्तांनी ठेवले प्रशासनासमोर ‘हे’ तीन पर्याय

पंढरपूर प्रतिनिधी । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव आता सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरदेखील पडत आहे. आषाढी एकादशी वारी समोर कोरोनामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा एक बैठक घेतली असून यात वारी बाबतचा निर्णय ३१ मे रोजी … Read more

पंढरपूरातील किर्तनकारांचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

सोलापूर प्रतिनिधी । किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेकांनी या प्रकरणी आपली मतं मांडली आहेत. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा अनेकानी निषेध ही केला आहे तर आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा वारकरी-फडकरी … Read more

माघी यात्रेसाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल; कोरोना व्हायरस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरात माघी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होऊ लागले आहेत. अशातच कोरोना व्हायरसचे सावट निर्माण झाले आहे. वारी काळात कोरोना व्हायरस पसरू नये. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णासाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार ही केले जाणार आहेत. यामध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्यासह पाच … Read more

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपुरात ११०० नागरिकांची आर्थिक फसवणूक

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपूर परिसरातील सुमारे अकराशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या चार ठकसेनांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत बंदचा देवस्थानांवरही परिणाम; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गर्दी रोडावली

आज देशभर भारत बंदची हाक वेगवेगळ्या कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी दिली होती. शेतकरी, कामगारांसोबत शासकीय कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. या संपाचा बाजारपेठेवर आणि देवस्थानांवरही परिणाम झाल्याचं पहायला मिळालं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आज शुकशुकाट पहायला मिळाला.

बिट काॅईनच्या माध्यमातून दुप्पट रक्कम करण्याचे आमीष दाखवून लाखोंची फसवणूक, डाॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

बिट काॅईन आभासी चलनातून पंढरपुरातील काही प्रतिष्ठीत लोकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंढरपुरातील एका डाॅक्टर विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी; भाविकांसाठी लॉकर्सची सुविधा

भाविकांसाठी पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून हा नियम लागू होणार आहे.

पांडुरंगा समक्ष घडली ‘फेसबुक’ बहीण-भावाची अविस्मरणीय भेट!

आजकाल तरुण पिढी फेसबुकच्या आभासी दुनियेच्या माध्यमातून मैत्रीची नवी नाती जोडू पाहतात तर काहीजण दूर गेलेला मित्रवर्गाच्या संपर्कांत राहू पाहतात. यातून काहींना फेसबुकच्या माध्यमातून जिवलग मित्र मिळतात. तर काहींना आपले असलेले मित्र फेसबुकच्या माध्यमातून टिकवता येतात. मात्र, आता फेसबुक केवळ मैत्रीपुरतं मर्यादित राहील नाही आहे. फेसबुकच्या माध्यमातून रक्ताची नसतील पण मायेच्या आणि स्नेहातून एकत्र भेटलेल्या भिन्न व्यक्तींमध्ये आता जिवाभावाची नाती तयार व्हायला लागली आहेत. अशाच एका बहीण-भावाच्या नात्याची कहाणी आपण पाहणार आहोत.

येरवडयाची हवा खाऊन या, कसं वाटतंय बघा – ईडी प्रकरणावरून सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारसभेत खोत बोलत होते. मंगळवेढा येथे बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले.