“महाविकास आघाडी सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न”; प्रवीण दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मलिकांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू केले आहे. राज्यात अनेक प्रश्न … Read more

“महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर हल्लाबोल केला. भाजपसोबतच्या युती संबंधी त्यांनी अनेक महत्वाची विधानेही केली. यावेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. “महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाजपवरील … Read more

“तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकास आघाडी सरकारचे सुरु; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणी महाविकास आघाडीने मलिक याचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहार. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला. आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच … Read more

प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात; दरेकर बचावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीच्या ताफ्याचा सातारा येथील पुणे बंगलोर महामार्गावर खंडाळ्याजवळ अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळ दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला. या महिनाभरात दरेकरांच्या गाडीला तिस-यांदा अपघात झाला असून तिन्ही अपघात एकसारखे आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर … Read more

“…हा तर फुसका बार निघाला”; पत्रकार परिषदेवरून प्रवीण दरेकर यांचा टोला

RAUT DAREKAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजपवर निशाणा साधत अनेक आरोप केले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. राऊतांनी आज भाजपचे साडेतीन नेते यांची नावे जाहीर करू असे सांगितले. मात्र, त्यांनी एकही नेत्याचे नाव … Read more

नाना पटोलेंना आता आंदोलन मागे घेण्याची उपरती सुचली का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस कडून मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घराबाहेर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन रद्द करतोय, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला. दरेकर म्हणाले, आता … Read more

किरीट सोमय्यांनी नौटंकी करू नये; अनिल परब यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. दरम्यान आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना परब यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. “सोमय्या जाता-जाता स्वतः पडले असतील. त्यांनी नौटंकी करू नये,” … Read more

भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने सोमय्यांवर हल्ला; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते. यावेळी शिवसैनिकांकडून सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “सोमय्या यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारने … Read more

केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून आघाडी सरकारला कोणी घाबरवू नये; नितेश राणेंप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली न्यायालयात शरण जाण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि पी चिदंबरम याचा फोटो ट्विट करीत आघाडी सरकारला इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारला तसेच राज्य सरकारला घाबरवण्याच्या कोणी प्रयत्न करू नये. आम्हीही कसे पुरून उरू शकतो … Read more

संजय राऊतांकडून शरद पवार आणि राष्ट्रवादीची पालखी वाहण्याचे काम; दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपवर निशाणा साधला जात आहार. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. “राऊतांना शिवसेना आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत काही देणेघेणे पडलेले नाही. त्यांच्याकडून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पालखी वाहण्याचे काम केले जात आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. … Read more