नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं, सुप्रिया सुळेंनी शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका स्पष्ट करत ती अजितची वयैक्तिक भुमिका असल्याचे सांगितले. With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W — … Read more

बाळासाहेबांची शिकवण शिवसेना विसरली – रविशंकर प्रसाद

महाराष्ट्रातील अनपेक्षित सत्तास्थापनेनंतर सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया येत असून केंद्रातील भाजपचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने भाजपसोबत असलेल्या युतीचा आणि मिळालेल्या स्पष्ट जनादेशाचा सन्मान केला नाही असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी आज स्थापन झालेलं सरकार महाराष्ट्राला दिशादर्शक वाटेवर पोहचवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

फडणवीस यांच्या शपथविधीनंतर खडसे यांची सूचक प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या सत्तानाट्यात पुन्हा एकदा शिवसेनेची पीछेहाट झाल्याची चर्चा आता होता आहे. याच बाबतीत भाजापचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे पुन्हा परत येतील, त्यांना भाजपने ब्लॅकमेल केलं आहे- संजय राऊत

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेत महाराष्ट्रातील राजकारणाला चांगलाच हादरा दिला. राज्यातील राजकीय भूकंपानंतर आता संजय पवार यांनी आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत असा दावा केला आहे. अजित पवार याना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. याबाबत उद्या सामानात आम्ही त्याचा खुलासा करू. तसेच धनंजय मुंडे आमच्या संपर्कात असून ते सुद्धा परत येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीआधी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या कुटुंबात सगळं आलबेल असल्याचं बोललं जात होतं. यानंतर निवडणुका झाल्या आणि सहानुभूतीच्या लाटेवर का होईना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला सरकार स्थापण्यापासून रोखलं. शनिवारी सकाळी मात्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून अजित … Read more

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली असून उद्धव ठाकरेंना त्यांच्यामुळे मान खाली घालावी लागली असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सत्तास्थापनेचा खेळ अनेक दिवस रंगल्यामुळे अजित पवार त्रस्त असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आवश्यक असेल तर गनिमी कावा करा पण जनतेचं हित बघा ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिला असून आम्हीही त्याप्रमाणेच … Read more

सरकार स्थापनेची फायनल बैठक, मुख्यमंत्री म्हणून ‘यांची’ होणार निवड?

राज्यातील सत्तानाट्य अंतिम अंकावर येऊन ठेपल आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आता फायनल बैठक मुंबईत होत आहेत. या बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. खातेवाटप आणि सत्तेची गणित या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. त्याअनुषंगाने या अंतिम बैठकीत मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.

“कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आना ही अच्छा होता है…” संजय राऊत यांचे भावनिक ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यात नवीन सत्ता समीकरणे निश्चित झाल्यामुळे आता भाजप आणि शिवसेना यांच्यातील नाते संबंध हे आता राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात असतील. अनेक वर्षे सोबत एकत्र काम केल्यानंतर शिवसेना व भाजप आता अधिकृतपणे वेगळे होणार आहेत. यामुळे साहजिक दोन्ही पक्षातील मैत्रीचं नातं आता हे पूर्वी प्रमाणे नसेल. ज्यां पक्षांशी तीस वर्षे एकत्र संघर्ष केला, आता … Read more

‘हम बुरेही ही ठीक…’ संजय राऊत यांचा भाजपाला पुन्हा  टोला 

मुंबई प्रतिनिधी ।  विधानसभा निवडणूक निकाल हाती आल्यापासून शिवसेना नेते संजय राऊत यांचे  नेहमीप्रमाणे ट्विटर वरून ‘बाण’ सोडणे चालूच आहे. आज सकाळीदेखील त्यांनी पंचवीस वर्षे सोबत असलेल्या भाजपला हिंदी मधील प्रसिद्ध शायरी द्वारे जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत आपल्या ट्विट मध्ये म्हणतात , ” हम बुरेही ही ठीक हैं , जब अच्छे थे तब कोनसा मेडल … Read more

सोनिया-पवार यांच्या भेटीत सत्तास्थापनेवर चर्चाचं न झाल्याने शिवसेनेची कोंडी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरु झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल आहेत. राज्यात अजूनही सत्ताकोंडी कायम आहे. अशा परिस्थिती पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टिने याभेटीकडे सर्वांचे लागून होते. मात्र, याभेटीत शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल चर्चाच झाली नसल्याचे पवार यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेची कोंडी तर झाली नाही न असा सवाल उपस्थित झाला आहे.