शिवसैनिकाची ‘शोले’गिरी! महायुतीचं सरकार स्थापन करा नाहीतर टॉवरवरून खाली उतणार नाही

महाशिवआघाडी सध्या राज्यातील सरकार स्थापनेवरून सत्तानाट्य सुरु असून भाजप शिवसेनेसह राष्ट्रवादी देखील बहुमत सिद्ध न करू शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. भाजपसोबत झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेऊन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात एक नवी राजकीय त्रिकुट तयार होऊन महाशिवआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे-काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक, फिफ्टी-फिफ्टी वरून पेच

राज्यात सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं भाजपाशी नातं तोडलं असताना महासेनाआघाडीच्या रूपात नवं समीकरण तयार होताना दिसत आहे. त्यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकत्रित सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांची राज्यातील काँग्रेस नेत्यांबरोबर मुंबईत महत्वाची बैठक सुरु आहे.

प्रिय शिवसेना, वीर सावरकरजींचा हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? – विजया रहाटकर

राजस्थान कॉंग्रेस सरकारने वीर सावरकर यांच्या नावापुढे ‘वीर’ लावण्यास केली मनाई मुंबई प्रतिनिधी । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी राज्यातील सत्ता हाती घेतल्यापासून पाठयपुस्तकांमध्ये व शिक्षण क्षेत्रात अनेक बदल केले आहे. आता नवीन केलेला बदल म्हणजे बारावीच्या पुस्तकामधून विनायक सावरकर यांच्या नावापुढील ‘वीर’ असा उल्लेख नको म्हणून नवे संशोधन केले आहे. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या … Read more

राज्यपाल गयारामच, महाराष्ट्र चालवणं म्हणजे पोरखेळ नाही – उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा धावता आढावा घेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेल्या वेळेतच शिवसेनेला बसवण्यात आलं. भाजपने असमर्थता दर्शवण्यासाठी वेळ घेतला असल्याची टीका करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आम्ही सोमवारी पहिल्यांदाच अधिकृत चर्चा केली आहे. काँग्रेसने हे स्वतःहून सांगितल्यामुळे भाजपच्या आरोपांना आता उत्तर मिळालं असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीने आम्हाला निवांत केलं, आता बघतो काय करायचं ते – शरद पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची रंगतदार बॅटिंग पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत असलेल्या आपल्या भूमिकांची माहिती देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अधिकृतरित्या मागितलेल्या पाठिंब्याची माहिती दिली. यावेळी पाठिंबा द्यायचा तर सांगोपांग चर्चा गरजेचं असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज चर्चा केल्याचं पटेल पुढं म्हणाले. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल यांनी राष्ट्रपती राजवटीचा … Read more

राष्ट्रपती राजवट लागणं दुर्दैवी – छत्रपती संभाजीराजे

राज्यात सत्तास्थापनेचं घोंगडं अजूनही भिजतच पडलं आहे. जर शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाटाघाटींवर विश्वास नव्हता तर त्यांनी आधीच योग्य नियोजन का केलं नाही? हा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेनेसाठी सत्ता-स्थापन करणं अवघड होत चाललेलं असताना राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंतची मुदत दिली होती.

सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे. सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, काँग्रेसचा ‘हा’ नेता मांडणार बाजू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी … Read more

संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते. राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष … Read more

नितेश राणे यांनी उडविली शिवसेनेची खिल्ली 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल बहुमत असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला म्हणजेच  शिवसेनेला निमंत्रण दिले होते.  मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडून शिवसेनेला सत्ता स्थापनेच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्यामुळे सेना पुन्हा बॅकफूट वर गेली आहे. काल संध्याकाळी सेनेचे शिष्टमंडळ यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली.  त्यात त्यांनी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी अधिकचे तीन दिवस मागितले होते. मात्र यावर राज्यपाल यांच्या कडून वेळ वाढवून देण्यास … Read more