ठाकरे सरकारची कामगिरी नेमकी कशी? ; देवेंद्र फडणवीस म्हणतात कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे सरकावर नेहमी या ना त्या कारणांनी निशा साधणारे भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार दोन वर्षे पूर्ण करीत असल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल केला आहे. “नेमकी या राज्यातील सरकारची कामगिरीच काय आहे? की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन हे केले जाते. मात्र, सरकारची … Read more

त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यातील ठाकरे सरकारबाबत एक अनोखी भविष्यवाणी केली आहे. ती म्हणजे ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार आहे. राणेंच्या या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. “भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असा टोला पटोले यांनी राणे … Read more

59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आता आलेली आहे…; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढला जात नसल्याने आता 58 मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा बांधवांवर 59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मराठा बांधवानी या … Read more

ठाकरेंच्या हातातला राज्याचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती; प्रवीण दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेत पुढाकार घेतला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकेकाळी राज्याचे पॉवर स्टेशन मातोश्रीवर होते. बाळासाहेब … Read more

महाराष्ट्रातील सरकार शिवसेना नसून शरद पवार चालवतायत; नवनीत राणा यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेत चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असल्याने यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. … Read more

आता खऱ्या अर्थाने देशाला सर्वसामान्य जनतेची ताकद कळली; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाचे असे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. “कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो … Read more

राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मालेगाव, अमरावतीत, नांदेड या ठिकाणी दंगली झाल्या. याची चिंता न करता बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार भाजपवर आरोप करत आहेत. “मालेगावात दुसऱ्या दिवशीच्या दंगलीत हिंदूंच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत आमचा हात होता तर पहिल्या दिवशीच्या हिंसाचारात तुमचा हात होता हे सिद्ध झाले आहे. … Read more

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केले. तसेच यावेळी पुरंदरेंना त्यांनी आदरांजलीही वाहिली. “शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर … Read more

1993 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, आता त्यांचे वारसदार काही बोलणार नाहीत का?; चंद्रकांतदादांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून भाजपचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “1993 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवाल पाटील यांनी केला आहे. भाजप … Read more

विधानसभा निवडणुकीत दगाफटका करून अमर, अकबर, अँथनीचे सरकार आले; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावरमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर विधानसभा निवडणुकीवरून टीका केली. “या राज्यातली जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगा फटका करून अमर, अकबर, अँथनीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, 2024 … Read more