“बा भास्कर जाधवा…. जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!” – महाराष्ट्र भाजप

चिपळूण | प्रचंड पाऊस झाल्याने आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर हे पूर्णपणे अस्थिर झाले. जीवितहानी काही प्रमाणात झाली असून अनेक कुटुंब, संसार अडचणीत सापडले आहेत, मात्र, त्याच सोबत वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या अनुषंगाने आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण मध्ये दाखल झाले होते. त्यांनी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली … Read more

‘पुलं’ चे गुगल डूडल…जयंतीदिनी अनोखी मानवंदना!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे  हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्या जयंती निमित्त गुगलने त्यांना अभिवादन केले आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना पु.ल.  आणि … Read more

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

अहमदाबाद प्रतिनिधी । गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. आज सकाळी त्यांची तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केशुभाई पटेल यांची सप्टेंबरमध्ये कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, तसेच ते ह्या संसर्ग आजारातून बरे देखील झाले होते. स्टर्लिंग हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार जनतेशी संवाद

दिल्ली प्रतिनिधी ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करतील. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे. त्यात पंतप्रधानांनी लिहिले की, “आज संध्याकाळी सहा वाजता देशातील नागरिकांशी संवाद साधेल. आपण सर्वांनी सहभागी व्हावे.” मात्र पंतप्रधानांनी आजच्या संवादात काय असेल हे निर्दिष्ट केलेले नसले, तरी ते देशातील कोरोना व्हायरस परिस्थितीबद्दल बोलतील अशी शक्यता आहे. सुरवातीच्या संपूर्ण टाळेबंदीत … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 92% वर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज  कोरोना बाधित रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे. गेल्या 100 दिवसांमधील सर्वात निचांकी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आज दिवसभरात 76 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 51002 झाली.  त्याच प्रमाणे 438 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 2622 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार … Read more

महाराष्ट्राचे सुपुत्र त्रिपुरा केडरचे तरुण IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे निधन.

परभणी प्रतिनिधी । 2015 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असलेले सुधाकर शिंदे (त्रिपुरा केडर) यांचे आज शुक्रवारी कोरोना विषाणू संसर्गमुळे निधन झाले. सुधाकर शिंदे हे मूळचे परभणी येथील रहिवासी होते. आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर प्रथम त्यांना नांदेडहून औरंगाबाद हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले व प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुण्यात आणण्यात येत … Read more

NDA ने आम्हाला बिहार निवडणूकी मध्ये पाच जागा द्याव्यात ; नाहीतर आम्ही स्वतंत्रपणे 15 जागांवर लढू – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा घटक पक्ष आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष NDA च्या सोबत बिहार निवडणूकीमध्ये उतरेल. त्यामुळे आम्हाला देखील ह्या निवडणूकी मध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली … Read more

सर्वोच्च न्यायालयाने UPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली; 04 ऑक्टोबरलाच होणार परीक्षा

नवी दिल्ली, प्रतिनिधी । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.  त्यामुळे आता 04 ऑक्टोबर 2020 रोजी नियोजित असलेली  परीक्षा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे  ढकलण्यावर कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. सुनावणीच्या वेळी मांडलेल्या “उमेदवाराला परीक्षेच्या जादा प्रयत्नाच्या पर्यायावर विचार करावा” ह्या मुद्यावर कोर्टाने … Read more

माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन

नवी दिल्ली, प्रतिनिधी । गेल्या सहा वर्षांपासून कोमामध्ये असलेले माजी संरक्षणमंत्री जसवंत सिंह यांचे आज रविवारी निधन झाले.  ते 82 वर्षांचे होते. 2014 मध्ये त्याच्या राहत्या घरात डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे ते दिल्लीतील लष्कर (संशोधन आणि संदर्भ) रुग्णालयात उपचार घेत होते. जसवंतसिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री, संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम … Read more

Breaking News । केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली, प्रतिनिधी ।  नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अखेरचा श्वास घेतला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. बेळगाव लोकसभा मतदार संघाचे ते खासदार होते. ते सलग 2004 पासून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.  कोरोना विषाणू संसर्गाचा … Read more