भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

milkha singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मल मिलखा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिलखा सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. करोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले … Read more

Covishield च्या दोन डोसमधलं अंतर कमी होणार? केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण!

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोव्हीडशिल्ड या दोन लसी प्रामुख्याने दिल्या जात आहेत. त्यापैकी कोव्हीडशिल्ड ही लस सुरुवातीच्या काळात 28 दिवसांच्या अंतराने दिली जात होती. त्यानंतर हे अंतर वाढून 45 दिवस करण्यात आले. मात्र ते १८ ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू करताना हे … Read more

ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं यावेळी चव्हाण यांनी सांगितलं होतं. आता याच मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव … Read more

दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजप – काँग्रेसमध्ये नवा राजकीय कलगीतुरा

digvijay singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम 370 हटवलं. मात्र त्यावेळेला कलम 370 बाबत केलेलं दिग्विजय सिंह यांचं विधान आता जोरदार चर्चेत आले आहे. ‘क्लबहाऊस’ या ॲप मधील लाईव्ह चर्चेदरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराशी बोलताना दिग्विजयसिंह यांनी 370कलम बाबत विधान केलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल … Read more

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह नागरिकांचा मृत्यू

sol

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात एकीकडे कोरोना महामारी पसरली असताना. आता देशाच्या सीमेवरून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते आहे जम्मू कश्मीरच्या सोपोर मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. #UPDATE | Jammu & Kashmir | Two policemen and two civilians lost … Read more

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. या बाबतीत ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी यासंदर्भात भेटी घेतल्या आहेत. अशा नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे डॉ. … Read more

सचिन पायलट दिल्लीत दाखल; राजकीय तिढा सोडवण्यासाठी प्रियांका गांधी करणार मध्यस्थी?

sachin pilot

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्या देखील भाजपा प्रवेशाबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपच्या उत्तर प्रदेश मधील नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सचिन पायलट हे वृत्त यांनी फेटाळून लावले आहे. त्यानंतर पायलट … Read more

भाजपानं सचिन तेंडुलकरशी बोलणी केली असतील, माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात धमक नाही : सचिन पायलट

Sachin Pilot CM

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश मधले महत्त्वाचे नेते जितीन प्रसाद यांनी नुकताच काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठच आता सचिन पायलट देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना चांगलाच वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी पायलट नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनीदेखील पत्रकार परिषदे मधून आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती. त्याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेमुळे … Read more

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या … Read more

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, संजय राऊतांचे भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी संपता संपेना. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा यांना वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत नंदूरबार येथे … Read more