केंद्रीय मंत्रिमंडळात मित्रपक्षातील नेत्यांना मिळणार स्थान? मोठा फेरबदल होण्याची शक्यता

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. नव्या चेहऱ्यांमध्ये अधिकतर भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांना संधी मिळू शकते. मोदींनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमधील नेत्यांना अधिक संधी दिली होती. यात जेडीयू सारख्या पक्षातील एकही नेत्याचा समावेश नव्हता. याशिवाय शिवसेने सारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व मिळाले होते.

उमेदवार बसपाचा, काम केलं राष्ट्रवादीचं; शिक्षा म्हणून बारामतीमध्ये काढली धिंड

अशोक माने यांनी राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचं निवडणुकीपूर्वीच बोललं जात होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती.

घड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला ! सातार्‍यात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, सातार्‍यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील नवलेवाडीमध्ये मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

साताऱ्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान सुरू झाल्यावर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घड्याळासमोरील बटन दाबले. मात्र व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत जात होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या तिथल्या निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घड्याळाला मतदान केले तरी ते कमळाला जात असल्याचं मान्य केल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यानंतर सदर ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं. मात्र, गंभीर घटनेबाबत आता पुढे निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही केली जाणार याबाबतच तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/445764886054352/

हो, फडणवीस पुन्हा येणार..!! महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा

टीम हॅलो महाराष्ट्र । दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी खालावली असून ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीचा निच्चांक पहायला मिळाला. विरोधकांचं निष्प्रभ असणं, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं पक्षांतर, कलम ३७० चा निवडणूक प्रचारासाठी केलेला वापर, कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा ठसवण्यात देवेंद्र फडणवीसांना आलेलं यश … Read more

‘मतदार ओळखपत्र’ नसल्यास १० पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी असेल ग्राह्य

मुंबई प्रतिनिधी । येत्या सोमवारी २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास पुढील १० पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 10 पुरावे :- 1) आधारकार्ड, 2) पॅनकार्ड, 3) ड्रायव्हिंग … Read more

कागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारचा दिवस शेवटचा आहे. अनेक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धती वापरून मतदारांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा होत आहे. उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत या ठिकाणी चांगलीच रंग पकडत असल्याचं पहायला मिळत आहे. आज कराड येथे प्रचाराच्या सांगता सभेत मात्र उदयनराजे काहीसे चिंतीत अवस्थेत पहायला मिळाले.

साताऱ्यात शुक्रवारी भरपावसात शरद पवारांनी घेतलेल्या सभेचा चांगलाच परिणाम राज्यभर पहायला मिळाला. आता उदयनराजे भोसले यांनी कागदावर लिहीलेलं भाषण वाचून शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर दिलंय. २०१९ च्या लोकसभेसाठी उदयनराजेंना तिकीट देऊन मी चूक केल्याचं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी भाषण लिहून आणलं होतं. हे भाषण वाचतानाही उदयनराजे कमालीचं अडखळत असल्याचं पहायला मिळालं. शरद पवारांवर नेमकी काय टीका करावी हेच त्यांना समजत नसल्याचं एकूण भाषणावरून स्पष्टपणे जाणवून येत होतं.

भाषणाच्या शेवटी त्यांनीच माझ्या मोडक्या तोडक्या भाषणातून तुम्हाला जे कळालं त्यावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आणि अतुल भोसलेंना साथ द्या. भाजपच्या विकासाला साथ द्या असं भावनिक आवाहन उदयनराजे यांनी शेवटी केलं.

शरद पवारांना प्रत्युत्तर देताना उदयनराजे अडखळले

गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणले?पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

‘मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत.गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता आज कराड शहरात झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीचे आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील सुद्धा उपस्थित होते.

महाराष्ट्रातील दुष्काळ काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित- नितीन बानगुडे पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता तर महाराष्ट्रातील इंच-इंच जमीन ही सिंचनाखाली आली असती , ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. शेतकरी मोडून पडला हे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. असा आरोप शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी बुलढाणा येथे केला.

काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला वाळव्यात मोठा धक्का 

राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना पाठींबा दिला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष सुधीर पिसे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे पुत्र सतेज पाटील, उरूण विकास सोसायटीचे संचालक शिवाजी पाटील, माजी नगरसेवक फारूख इबुशे, मुनीर इबुशे यांच्यासह उरूण परिसरातील पाटील, जाधव, मोरे, कोरे भावकीतील प्रमुखांनी इस्लामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर पाठींबा दिला.