पवार साहेबांना सोडून गेलेल्यांची काय गत झाली बघा ; अजितदादांचा पिचड पिता-पुत्रांना टोला

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही लोक साहेबांना (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) आणि मधुकर पिचड या पितापुत्रांना टोला लगावला आहे.अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित … Read more

सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय चुलत्यांमुळे लागली – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या बेधडक कामामुळे आणि निर्णयक्षमते मुळे प्रसिद्ध आहेत. अजितदादा नेहमीच भल्या पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचं कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून घेतले असल्याचं सांगितलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय … Read more

कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं होतं?? हे सांगू का ; अजितदादांनी विरोधकांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षांकडून मुंडेंवर अजूनही टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरले आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार म्हणाले, … Read more

अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही ; निलेश राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर प्रहार

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार निलेश राणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणा नंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस वर तोफ डागली होती. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना निलेश राणेंना टोला लगावला होता. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, त्यावर मी व्यक्त व्हायचं का? निलेश राणेंच्या डोक्यावर … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अजित पवारांचं मोठं विधान ; म्हणाले की…

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटकमध्ये गेलेली सीमाभागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणे, हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना … Read more

…नाहीतर हाच निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही ; निलेश राणेंचा अजितदादांवर निशाणा

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग प्रकरणी झालेल्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्यानंतर भाजपचे खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती. निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे … Read more

चंद्रकांत पाटलांच्या गावातच आघाडीत बिघाडी ; अजित पवार म्हणतात…

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे महाविकास आघाडी सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवर वर अशीच आघाडी आहे असं नाही. त्यातच आश्चर्य म्हणजे भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्याच गावात चक्क काँग्रेस – राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली असून शिवसेनेला एकाकी पाडलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

औरंगाबाद की संभाजीनगर ?? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका ; म्हणाले की …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. औरंगाबादच्या नामकरण संभाजीनगर करण्याला शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार का??? अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील मोठी निवडणूक असून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी समोर भाजपचे बलाढ्य आव्हान असतानाच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडी खरंच मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार … Read more

अजित पवार पुन्हा भाजप सोबत जाणार ?? आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

aathawale ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा खळबळजनक दावा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान आठवलेंच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद … Read more