फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच अजित पवार यांच्यासोबत 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी पार पडला असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यांनतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर खुद्द शरद पवारांना विचारलं असताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमानी शरद पवारांना फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबाबत छेडले असता , मला वाटलं देवेंद्र … Read more

अजितदादा मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करायचं आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं होत. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी लागणारी संख्याच नाही त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे म्हंटल आहे. नाशिक … Read more

छ. संभाजी महाराजांबद्दलच्या विधानाबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले की..

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले होते. मात्र आज खुद्द अजित पवारांनीच माध्यमांसमोर येऊन आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आज. स्वराज्यरक्षक म्हणणं हेच संभाजी महाराजांना न्याय देणं आहे असं … Read more

गायरान जमीन घोटाळा प्रकरणी सत्तार अडचणीत? राजीनाम्यासाठी अजित पवार आक्रमक

abdul sattar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने या प्रकरणावरून सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज अजित पवारांनी विधानसभा सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत संताप व्यक्त केला … Read more

मी काय दुधखुळा नाही; पवारांबद्दलच्या प्रश्नावरून अजितदादा भडकले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत वापरलेल्या शब्दामुळे त्यांचे निलंबन करण्यात आलं. मात्र या कारवाईनंतरही अजित पवारांनी संयमी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत खुद्द अजित पवारांनाच विचारलं असता ते थेट पत्रकारांवरच संतापले. अजित पवार म्हणाले, शरद पवार नाराज आहेत … Read more

… म्हणून राष्ट्रवादीबरोबर इतर कार्यक्रमांना गैरहजर होतो; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील मंथन शिबिरासही गैरहजेरी लावली. तर शिंदे गटाचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. आता पाच दिवसानंतर पवार पुन्हा … Read more

राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार? अजित पवारांचा कार्यकर्त्यांना नेमका सल्ला काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढायचं असं समजूनच कामाला लागा अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. अजित पवार हे साताऱ्यातील सोळशी या ठिकाणी एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या च्या कार्यक्रमात आले असताना त्यांनी याबाबत सूचना केल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कोणासोबत आघाडी करायची … Read more

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज? पत्रकार परिषदेत घेत दिले स्पष्टीकरण

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. मात्र यावेळी कार्यक्रम सुरु असतानाच अजित पवार मधेच उठून गेले तसेच त्यांचं भाषणही झालं नाही त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आपण कधीही नाराज नाही, तेथे आमचे वरिष्ठ नेते असल्याने मी स्वत:हून बोलणं टाळलं असं स्पष्टीकरण देत त्यांनी सर्व चर्चाना … Read more

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवारांच्या नावाचा आग्रह केला होता अखेर आज अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. सध्या महाविकास आघाडीच्या आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि … Read more

अजित पवारांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या … Read more