चांगली बातमी ! जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८५.९१ टक्के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जळगांव जिल्हयात देखील प्रचंड प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अनेक जवळच्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याने लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. पण कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत बाधित असलेल्या ९४ हजार ७८२ रुग्णांपैकी ८१ हजार … Read more

महापालिकेचा निष्काळजीपणा ट्रकचालकाला भोवला; दुभाजकाला धडकून ट्रक उलटला…

औरंगाबाद | सिल्लोडहून पुण्याला मका घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी (ता.२५) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील जळगाव रस्त्यावरील चौकातील वोक्खार्ड दुभाजकाला धडकला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व मकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एका बाजूने जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. महापालिकेतर्फे या चौकात पोलचे काम करण्यात येत आहे. यासाठी रस्त्यावर … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more

तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता ‘त्या’ अंजली पाटीलांचा दमदार विजय

जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांच्या विजय-पराजयाची चर्चा माध्यमांत रंगल्या आहेत. मात्र अशात एका विशेष उमेदवाराच्या विजयाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील यांचा तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात त्यांचा दणदणीत विजय झाला … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 92% वर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज  कोरोना बाधित रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे. गेल्या 100 दिवसांमधील सर्वात निचांकी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आज दिवसभरात 76 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 51002 झाली.  त्याच प्रमाणे 438 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 2622 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार … Read more

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 742 कोरोना बाधित रुग्णांची भर; तर 883 रुग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 742 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 43301 झाली आहे. त्याच प्रमाणे 833 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9885 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 32336 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 19 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 878 कोरोना बाधित रुग्णांची भर; तर एकूण मृत्यू संख्या 01 हजारच्या पुढे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या  878 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 40165 झाली आहे. त्याच प्रमाणे 707 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9988 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 29168 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 18 मृत्यू झाले असून आतापर्यंत … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची आढळली रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या; आज 1063 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 1063 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 30749 झाली आहे. त्याच प्रमाणे 502 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 8055 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 21845 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 9 मृत्यू झाले असून … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक ; दिवसभरात सापडले तब्बल 801 नवे रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 801 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 28933 झाली आहे. त्याच प्रमाणे 562 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 7272 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 20830 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 09 मृत्यू झाले असून … Read more