‘अब की बार २५० टच !’ – चंद्रकांत पाटील

‘भाजपा’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावरील शिलादेवी शिंदे सरकार महाविद्यालयाच्या ६१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरती पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

‘तिकीट नाही दिलं तर मी काय गप्प बसणार आहे!’- एकनाथ खडसे

नाथाभाऊला तिकीट नाही दिलं तर काय नाथाभाऊ काय गप्प बसणार आहे’ काय. विकासकामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्थ बसू देणार नाही असं विधान करत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला. खडसे मलकापूर येथे भाजपा उमेदवार चैनसुख सांचेतींच्या प्रचारासाठी आले होते.

राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ल्या – स्मृती इराणी

”काँग्रेस चे राहुल गांधी म्हणतात त्यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. मात्र अमेठी मध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा.राहुल गांधींनी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्या” अशी घणाघाती टीका केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आणि ‘भाजपा’च्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी केली आहे. श्रीगोंदा येथे बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग भाजपला राणे प्रवेश मान्य, अंतिम निर्णय भाजप प्रवेशावर कोअर कमिटी घेणार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत आज भाजपाची मुबंईमध्ये कोअर कमिटी बैठक होणार आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोललं जातं आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत निर्णय होणार असून भाजपा शिवसेना युती होणार की नाही यावर देखील चर्चा होणार आहे. परंतु आत्तापर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत काहीच कल्पना नाही असे सांगणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपला देखील … Read more

‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’- विनायक राऊत

रत्नागिरी प्रतिनिधी। रत्नागिरी जिल्ह्यातील महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प होऊ शकतो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आज ‘नाणार रिफायनरी प्रकल्प’ विरोधी शेतकरी , मच्छिमार संघटनेची तारळ येथे सभा  झाली. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची उपस्थिती या सभेला उपस्थिती होती. यावेळी ‘आमचं नातं लाल मातीशी, मग आम्हाला रिफायनरी नको,  दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री … Read more

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ही जनादेश यात्रा जाणार असून यासाठी भाजपाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झालेली आहे. इस्लामपूर येथे … Read more

राष्ट्रीय सर्व्हे : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत तर कॉंग्रेस १०० जागांच्या आत

Untitled design

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताच एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हे मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. तर कॉंग्रेस ९७ जागांवर गुंडाळला जाण्याची शक्यता या सर्व्हेतूनव्यक्त करण्यात आली आहे. तर प्रदेशिक पक्षांना कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे. या सर्व्हेसाठी  देशातील  सर्वच म्हणजे … Read more

कोण आहे हा अमित शहा – राज ठाकरे

Thumbnail

नवी मुंबई | अमित शहांचा एकेरी उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली आहे. शहांच्या तोंडावर नेहमी अहंकार दिसतो. मोदींच्या छत्रछायेत शहा यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले. या माणसाचे वैयक्तिक कर्तृत्व काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अटल … Read more

गंभीर प्रश्नांमधे हात घालायचे सोडून मोदी करत बसतात योगा – राज ठाकरे

Thumbnail

नवी मुंबई | गंभीर प्रश्नात हात घालायचे सोडून पंतप्रधान नरेंन्द्र मोदी योगा करत बसतात आणि योगा करून झाला की बॅग उचलून विदेशात पळतात अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका कामगार सेनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. ‘नोटबंदीवर भाजप वाल्यांनी बोलून दाखवावे. नोट बंदीचे फायदे सांगा म्हणले तर भाजपची … Read more