वाढत्या गर्मीनं विदर्भ बेजार; अकोल्यात 47.4 अंश तापमानाची नोंद

अकोला । एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोकं हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज 47.4 ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान सहन … Read more

बच्चू कडूंचे स्टिंग ऑपरेशन; वेषांतर करून कंटेनमेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न मात्र…

अकोला । राज्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. राज्य सरकार देखील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन केले आहे. #अकोला | आमदार … Read more

अकोला-पातूर मार्गावर बोलेरो पिकपची दुचाकीला धडक; एक जागीच जण ठार

अकोला प्रतिनिधी । अकोला-पातुर रोडवरील लाखनवाडा येथे पातुरकडून अकोल्याकडे जाणारी बोलेरो पिकपला भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला पिकअप धडकल्यानं या अपघातात एक जण ठार झाला आहे. पातुरकडून अकोलाकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकप क्रमांक MH30 BD 0439 भरधाव वेगात दुसर्‍या गाडीला ओहरटॅक करतांना समोरून येणाऱ्या प्रभू हिरासीया वय 50 राहणार अकोला यांच्या … Read more

न्याय! मूकबधिर विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणाऱ्या शिक्षिकेला ५ वर्षांची कडक शिक्षा

शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेतानाचा शिक्षिका शितल अवचार हिचा विडिओ झाला होता.  त्यानुसार या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणावर आता जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि ३० हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे. पोस्को कायद्यान्वये महिलेला शिक्षा ठोठावण्याचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच खटला आहे.

केंद्रीय मंत्री संजय धोत्रेंची सभा रणजित पाटील समर्थकांनी उधळली

अकोला प्रतिनिधी । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार हरीष पिंपळे यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. याचाच जाब केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना रणजित पाटील समर्थकांनी त्यांना विचारला. यातून एकच गोंधळ उडवत पाटील समर्थकांनी अखेर धोत्रेंची सभा उधळली. पिंजर इथं आयोजित सभेत हा सर्वप्रकार घडला.

कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.

आता प्लास्टिकसुद्धा सोडेना राष्ट्रवादीची पाठ; शरद पवारांच्या सभेत प्लास्टिक वापरामुळे पक्षाला १० हजारांचा दंड

सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

अकोल्यात दिव्यांगांची अनोखी मतदार जनजागृती रॅली

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

अकोल्यात आशा स्वयंसेविकांचे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन

अकोला प्रतिनिधी | आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळी पट्टी बांधून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यातही आशा स्वयंसेविकांनी आंदोलन छेडले आहे. आशा स्वयंसेविकांना लसीकरण, सर्व्हे, आरोग्यविषयक प्रबोधन यासह विविध ७३ प्रकारची काम करावी लागत असून, कामांच्या तुलनेत … Read more