शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, व केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डि.लिट पदवी देण्यासाठी राजभवनाने परवानगी दिली होती. त्यानंतर नियमानुसार शुक्रवारी व्यवस्थापन बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर निर्णय झाल्याने आता अधिसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. … Read more

प्रेमात जात आलीच! आधी बनविले संबंध अन लग्नाची वेळ येताच म्हणे जात जुळत नाही

औरंगाबाद – असे म्हणतात की प्रेम जात, धर्म काही पहात नाही. परंतु अजुनही बऱ्याच ठिकाणी प्रेमात जात आडवी आल्याचे आपल्याला पहायला मिळते. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीण येथे उघडकीस आली आहे. स्पर्धा परिक्षाची तयारी करताना दोघे मुंबईत दोघांची भेट झाली. भेटीतून मैत्री झाली. पुढे हीच मैत्रीचे प्रेमामध्ये रूपांतर झाले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यानच्या … Read more

नागरिकांना दिलासा! शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी वाढ

Water supply

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात 11 दल लिटर्सने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली. औरंगाबाद शहरासाठी सध्या … Read more

‘त्या’ खुनाचा तपास विशेष पथकाकडे 

    औरंगाबाद – देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून सुखप्रित कौर ग्रंथी या विद्यार्थिनीचा आरोपी शरणसिंग सेठी याने निर्घृण खून केला. या खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी तपास विशेष पथकाकडे वर्ग केला आहे. दोन पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांचे हे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.   गुन्हे शाखेचे वरिष्ठ … Read more

औरंगाबाद-जालना रोडवर बस आणि जीपचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

  औरंगाबाद – औरंगाबाद- जालना महामार्गावर गाढे जवळगाव फाट्यावर बस-जीपच्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.   जालन्याकडून औरंगाबादेकडे येणारी कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढे जवळगाव फाट्यावर सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की जीपचा समोरील … Read more

पोलीस आयुक्तांना शहरात काय चाललंय याची खबर नसते- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

    औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. याच वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तालयात तिन्ही पोलीस उपयुक्त यांची भेट घेऊन गुन्हेगारीवर आळा कसा घालता येईल यावर चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तथा आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र … Read more

महापालिकेचा बेकायदा नळांवर ‘आक्रोश’

  औरंगाबाद – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात बेकायदा नळ कनेक्शन बंद करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, या पथकाने ज्या भागात नागरिकांच्‍या तक्रारी आहेत, तिथे बेकायदा नळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भावसिंगपुरा भागात एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. त्यानुसार मंगळवारपासून … Read more

औरंगाबाद-पुणे मार्गावर आता धावणार इलेक्ट्रिक बस 

Electric buses

औरंगाबाद – औरंगाबाद-पुणे या गर्दीच्या मार्गावर साधारण जुलैपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याची तयारी महामंडळाने केली आहे. यासाठी औरंगाबाद आगाराला 20 इलेक्ट्रीक बस दिल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार असल्याने महामंडळाने चार्जिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.   राज्य शासनाने स्वीकारलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाच्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या ताफ्यात … Read more

फक्त सातशे रुपयांसाठी मुलानेच केली आई-वडिलांची हत्या 

औरंगाबाद – शहरातील पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ 700 रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश कलंत्री यास … Read more

‘हे तर जुम्मे के जुम्मे सरकार’; केंद्रीय मंत्री दानवेंनी केले राज्य सरकारचे नामकरण

    औरंगाबाद – शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.   यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास … Read more