केंद्रीय मंत्री नारायण राणेंची वकिलांसोबत बैठक सुरु….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. या संदर्भात चिपळूण येथील जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यापूर्वी मंत्री नारायण राणेंनी आपल्या वकिलांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून अटकेपूर्वी कोणत्या कायदेशीर गोष्टी कराव्यात याची माहिती मंत्री राणे घेत आहेत. भाजपच्या जन आशीर्वाद … Read more

शिवसेना आक्रमक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता

Naryan Rane N CM

चिपळूण | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपची जन आशीर्वाद यात्रा मुंबईतून आता कोकणात गेलेली आहे.  काल रायगड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. राणेंचा मुक्काम सध्या परशुराम … Read more

एकही पूरग्रस्त राज्य सरकारच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही – छगन भुजबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. यात पूरग्रस्तांना राज्य सरकारच्यावतीने मदत पाठविण्यात आली असल्याचे माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली. एकही पूरग्रस्त सरकारच्या अन्न, धान्याच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी … Read more

पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, संतप्त पूरग्रस्तांचा आदित्य ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या पुरग्रस्तांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढे मोठे निक्सन झाले आहे. आणि पर्यावरणमंत्री असूनही … Read more

“बा भास्कर जाधवा…. जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!” – महाराष्ट्र भाजप

चिपळूण | प्रचंड पाऊस झाल्याने आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर हे पूर्णपणे अस्थिर झाले. जीवितहानी काही प्रमाणात झाली असून अनेक कुटुंब, संसार अडचणीत सापडले आहेत, मात्र, त्याच सोबत वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या अनुषंगाने आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण मध्ये दाखल झाले होते. त्यांनी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली … Read more

डोंगर खचून मालकाचं घर गाडलं गेलं; पाळीव कुत्रा 2 दिवसांपासून ढिगार्‍याकडे पाहत उभा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात पावसाने हाहाकार केला असून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत महापूर आला आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आत्तापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 99 जण अजूनही बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे नावाच्या गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली … Read more

राज्य, केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्थांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढगफुटीसद्रूश्य पावसामुळे चिपळूण तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचून एनडीआरएफचे पथक पुण्याहून चिपळुणात रात्री उशिरा दाखल झाली. या ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सकाळी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे आज महाड, चिपळूण या जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी रवाना झाले. केंद्र … Read more

चिपळूणमध्ये ढगफुटी : मदतीसाठी सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण -कोयना नगर मार्गे चिपळूणला रवाना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काल एनडीआरएफचे पथक उशिरा चिपळूणमध्ये दखल झाले. त्यानंतर आज चिपळूण मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत … Read more

NDRFची टीम अडकली : चिपळूणला मदत कार्याला निघालेले 40 जण कोयनानगरजवळ अडकले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली असल्याने वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागातील घरात व दुकानात पाणी साचले आहे. याठिकाणी एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणला मदतीसाठी निघालेली आहे. मात्र या टीमच्यापुढे विघ्नांची मालिका सुरू झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद, झाडे व दरडी कोसळलेल्या आहेत. चिपळूण येथे … Read more

चिपळूणमध्ये ढगफुटी ; मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी- शिव नदीला पुर, जलमय परिस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक गावांचेही पूल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. बुधवारपासून मुसळधारपणे कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण … Read more