भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

jp nadda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे. आपली प्रकृती स्थिर असून काळजी करू नये, असं त्यांनी म्हटलं असून तसं ट्विटच त्यांनी केलं आहे. यापूर्वी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची … Read more

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनाही कोरोनाची लागण

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे कामगार मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना करोनाची बाधा झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांचा करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत राज्यातल्या सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना करोनाची बाधा झाली त्यात आता दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश झाला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट … Read more

‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही कोरोनाची लागण

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि  रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आठवले यांची प्रकृती उत्तम आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून ४ दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. … Read more

सुप्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण

चेन्नई । सुप्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. इस्पितळातून व्हिडिओ शेअर करून एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वतःत कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं. आपली प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचंही त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितलं. एसपी बालासुब्रमण्यम व्हिडिओत म्हणाले कि, ‘गेल्या दोन- तीन दिवसांपासून माझी प्रकृती थोडी … Read more

अमित शहांनंतर भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं … Read more

सातारा जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 97 आणि अँटिजन टेस्ट किटद्वारे 5 असे एकूण 102 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील कराड शहरातील बुधवार पेठ येथील 59 वर्षीय पुरुष, … Read more

कोरोना चाचणी केल्या शिवाय दुकान उघडता येणार नाही; अन्यथा फौजदारी गुन्हा होणार दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन आणि किराणा दुकानदाराने रविवार पूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधन कारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल त्यालाच रविवार पासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार आहे. शनिवारी रात्री बारा वाजता … Read more

महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातच कसे? बलात्काराच्या घटनेने चित्रा वाघ यांचा सवाल

मुंबई । देशात कोरोनाचे संकट वाढले आहे. सर्व ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.सर्व ठिकणी विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. काही दिवसांपूर्वी पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर महिलेने याविरोधी तक्रार दाखल केली होती. कोरोनाच्या संकटासोबत … Read more

सौरव गांगुली ‘होम क्वारंटाइन’; मोठ्या भावाला झाली कोरोनाची लागण 

कोलकाता । BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे मोठे भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सौरव गांगुलीने स्वत:ला घरातच क्वारंटाइन करून घेतले आहे. गेले काही दिवस स्नेषाशिष यांना … Read more

Breaking | कराडमध्ये 2 कोरोना अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

कराडमध्ये 2 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.