वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. … Read more

युरोपातील ‘हा’ देश आता कोरोनामुक्त; जिंकली कोरोनाची लढाई

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. अशातच एक युरोपीय देश कोरोनामुक्त झाला आहे. युरोपातील एक देश कोरोनामुक्त झाला आहे. युरोपातील देश स्लोवेनिया सरकारने घोषणा केली आहे की, ‘देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. तसेच त्यांना विशिष्ट आरोग्यासंदर्भातील उपाययोजनांची आवश्यकता नाही.’ असं करणारा स्लोवेनिया युरोपातील पहिला देश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या … Read more

पुण्यात मे अखेरपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा सुमारे ५ हजारांपर्यंत जाईल- महापालिका आयुक्त

पुणे । पुणे शहर कोरोना विषाणूच्या विळख्यातून कधी मुक्त होईल असा प्रश्न पडत असताना शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील १५ दिवसांत शहरात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या कोरोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही … Read more

देशभरात मागील 24 तासांत 103 जणांचा कोरोनामुळं मृत्यू; ‘या’ राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांतील आकडेवारीनुसार 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार पार पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘आतापर्यंत 85 हजार 940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 2752 लोकांचा … Read more

दुर्दैवी! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनाने घेतला बळी

मुंबई । मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यू … Read more

लपूनछपून दिल्लीतून चीनला पाठवले जात होते ५ लाख मास्क अन् ५७ लिटर सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता, देशात मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीईच्या किटची मागणी वाढत आहे. या दरम्यान, सध्या गरज असलेल्या या वस्तू बेकायदेशीरपणे चीन तसेच अन्य देशांत एक्सपोर्ट केल्याचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. गुप्तचरां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतील आयजीआय विमानतळावर एयर कार्गो वर कस्टम विभागाकडून छापे टाकण्यात … Read more

मांजरांमुळे पसरु शकतो कोरोना ? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे पाळीव मांजर असल्यास आणि आपल्याला ती खूप आवडत असल्यास, तिचे चुकूनही चुंबन घेण्याचा प्रयत्न करू नका. एका लॅबने केलेल्या प्रयोगामध्ये याची पुष्टी करण्यात आलेली आहे की कोरोना विषाणू असलेली मांजर ही बाकीच्या मांजरांनाही संक्रमित करु शकते तसेच या मांजरांमध्ये कधीही कोविड -१९ची लक्षणेही दिसून येणार नाहीत. या प्रयोगाचे हे निकाल … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७८ हजार पार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. एव्हाना देशव्यापी लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर … Read more

मध्य प्रदेशात जैन साधूंच्या स्वागतासाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर; रस्त्यावर लोकांची तुडुंब गर्दी

सागर, मध्यप्रदेश । देशभरात कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण मिळवता आलं आहे. त्यामुळं गेले दीड महिन्यापेक्षा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. याकाळात कुठल्याही सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सवानिमित्त एकत्र येण्याला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या काळात घातलेले निर्बंध धाब्यावर बसवून धार्मिक कारणांवरून लोक एकत्र येत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करून … Read more

देशभरात २४ तासांत १२२ जणांचा कोरोनाने मृत्यू; 3 हजार 525 नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही नियंत्रणात न आल्यानं लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, मागील २४ तासांत देशभरात 3 हजार 525 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 122 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 74 हजार 281 वर पोहचली आहे. ज्यामध्ये … Read more