अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव फसला; तरुणीने दोन हात करत केलीस्वतःची सुटका

तरुणीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वच स्थरांतून कौतुक करण्यात येत आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, ही विद्यार्थिनी सकाळी साडेआठ वाजता शाळेत जात असताना, शाळेपासून ५०० मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला तोंडाला मास्क घालून दोन तरुण त्याठिकाणी आले आणि…

मेळघाटात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील घटांग या गावाच्या हद्दीमध्ये एका २७ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृत महिलेचा गळा ओढणीच्या सहाय्याने आवळून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यात घरफोड्या वाढल्याची पोलीस महानिरिक्षकांची कबुली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यामध्ये घरफोड्यांच्या संख्येमध्ये वाढ निदर्शनास आली आहे. त्याच बरोबर काही पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डमध्ये देखील त्रुटी आढळून आल्याची कबुली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या तिघांना केले जेरबंद;मुलीची सांगली पोलिसांकडून शर्थीने सुटका

लातूर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये नाझीया शेख, लियाकत शेख, बळीराम विरादार अशी त्यांची नावे आहेत. तर चौथा एजंट सुभाष हा अंधाराचा फायदा घेऊन पळाला. गुरुवारी रात्री येथील एस.टी. स्टँड परिसरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी विकास कांबळे यांनी फिर्याद दिली.

ऑनलाईन वस्तू मागवणे डॉक्टरला पडले महागात; लिंक फॉलो करताच खात्यातून दिड लाख लंपास

काही मिनिटांतच त्यांच्या बॅंक खात्यामधून एक लाख ४९ हजार ९९७ रुपये एवढी रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळती झाली. आपली फसवणूक झाले असल्याचे समजताच याप्रकरणी महिला डॉक्‍टरने सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, पोलिसांनी संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत मुलाने केला निर्घृण खून

जिल्हयातील खटाव तालुक्यातील मोराळे गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरण शहाजी शिंदे असं वडूज पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर कांताबाई शहाजी शिंदे असं मयत महिलेचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून मुलगा किरण याने आपली आई कांताबाई हिच्याशी वाद घालत हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न चिन्ह

एटीएम फोडण्याचे दोन प्रकार उघडकीस आल्यानंतर, सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरची पाहणी करण्यासाठी संयुक्त पथक नियुक्त केले. मात्र तरी देखील शहरात सहा एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत. 

४ थ्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू;कामगार सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या इमारतीचे रंगकाम करणाऱ्या कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा घटनेची नोंद करण्यात आली आहे.

हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करू नका; राऊतांचा भाजपवर निशाणा

व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका.

पिंपरीतून महामेट्रोच्या साहित्यावर डल्ला; एका महिन्यानंतर गुन्हा दाखल

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम जलदगतीने सुरु आहे. काही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम सुरु असताना चोरटयांनी या मेट्रोच्या साहित्यावरच डल्ला मारायला सुरवात केली आहे.