मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्ये रुजविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमित संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

‘मी स्वप्नात बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार’; राऊतांच्या दिलखुलास गप्पा

पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का?

मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्धव ठाकरेंकडून जोरदार हालचाली

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री प[पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले.

शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा प्रयत्न म्हणजे सुर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार – जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. रविवारीही अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगितले. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या सदर … Read more

नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं, सुप्रिया सुळेंनी शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका स्पष्ट करत ती अजितची वयैक्तिक भुमिका असल्याचे सांगितले. With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W — … Read more

‘प्रिय देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री पदी नसणार ‘! देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून चाहत्याची ‘खंत’

‘मी पुन्हा येईन’ असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा अनपेक्षित निकाल लागला. आणि ‘सत्ता स्थापन करणारच’ असा आत्मविश्वास असणाऱ्या भाजपा , अर्थातच ‘महायुती’ला मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने ‘महायुती’मधील दोन बडे पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना दोघांनी देखील एकमेकांसोबत काडीमोड घेतला. याचा परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा लोप पावली. आता आपल्या लाडक्या माजी मुख्यमंत्र्यासाठी त्यांच्याच एका चाहत्याने पत्र लिहिले आहे. मयूर डुमणे असे पत्र लिहिणाऱ्या चाहत्याचं नाव आहे. नक्की काय आहे पत्र जरा वाचाचं.. 

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

उद्धव ठाकरेंनी माझे फोनच घेतले नाहीत; त्यांचे नेते मात्र खालच्या पातळीवरचे आरोप करतच राहिले

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा! आता काय करणार?

राज्यात सत्ता कोणाची हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क असल्याचे सांगत आहे. दरम्यान सत्तास्थापनेसाठी थोडाच अवधी उरला असताना मुख्यमंत्री राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना आपला राजीनामा सादर केला. यावेळी भाजपचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.