MIM च्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । महावितरणचे कंत्राट आणि कामाच्या दर्जावरून एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये गुरुवारी रात्री चांगलाच राडा झाल्याची चर्चा आहे. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन नगरसेवक जखमी झाले होते. परंतु, यात दोन्ही गटांकडून तक्रार देण्यासाठी कोणीही समोर न आल्याने अखेर सिटी चौक पोलिसांनी तक्रार देत नगरसेवकांसह वीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक नासेर सिद्दीकी, अजीम ऊर्फ अज्जू नाईकवाडी, … Read more

दारुच्या दुकानांबाहेर गर्दी करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा!- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला आहे. अपवाद वगळता राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा वेळी दारूच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी … Read more

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; चर्चेसाठी सहा तासांचा अवधी

राज्यसभेत बहुमत नसले तरी हे विधेयक मंजूर होईल असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त होत आहे. तसेच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार असली तरी भाजपाला मात्र हे विधेयक राज्यसभेत पारित होईल अशी आशा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.

‘हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही’; इम्तीयाज जलीलांची सत्ताधाऱ्यांना तंबी

आजचे देशातील सत्ताधारी मुस्लिमांना दहशतवाद्यांच्या नजरेतून बघतात. सिमी काय, आयसिस काय, मुजाहिद्दीन काय, दहशतवादी म्हटलं की आम्हालाच टार्गेट करतात. पण एक भारतीय मुस्लीम म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे असा घणाघाती पवित्रा एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीत घेतला.

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर ; यादीत २२ जागांचा समावेश तर जातीचाही उल्लेख

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत देखील लोकसभा उमेदवारांच्या यादी प्रमाणे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर एमआयएम सोबत पुन्हा संधान नबंधता विधानसभेच्या सर्व जागा वंचित लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. एमआयएमने वंचित सोबत काडीमोड घेतल्यानंतर आपने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वंचित … Read more

कॉंग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा प्रसार माध्यम कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र दर्डा यांनीही काँग्रेसच्या प्रसार माध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र दर्डा सलग १५ वर्षे आमदार राहिले आहेत. तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदेही भूषवली आहेत. ते दैनिक ‘लोकमत’ … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर परिणाम करणारी बातमी ; एमआयएम , वंचितच्या तलाकनाम्यावर ओवेसींची सही

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून घोषणा केली होती. मात्र यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसी जोपर्यंत युती तोडण्याच्या निर्णयावर काही बोलत नाहीत तोपर्यंत कोणत्याही वावड्या खऱ्या मानू नका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र आज ओवेसींनी देखील हात वर केले आहेत. त्यामुळे … Read more

प्रकाश आंबेडकरांना आरएसएसची फूस : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मते आपल्याकडे वळविली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष संपल्यात जमा आहेत. अशावेळी एमआयएमला आठ जागा देऊ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आम्हाला का झुलवत ठेवत आहेत? हे कळायला … Read more

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात

नागपूर प्रतिनिधी |  वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून एमआयएम वंचित मधून बाहेर पडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून या संदर्भात घोषणा केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची मी हैद्राबाद येथे जाऊन भेट घेतली आहे. तसेच हैद्राबाद वरून काही प्रतिनिधी येऊन मला … Read more