आम्ही ठाकरे सरकारच्या सोबत; अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्र गेल्या २ दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीच्या छायेखाली आहे. आता हे वादळ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नुकसान होते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

निसर्ग चक्रीवादळ: जवळपास ४० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असून काही तासात हे वादळ रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४० हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या दलाने या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तसेच मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता; एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात

अलिबाग । हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळ शक्यता आहे. त्यामुळे अलिबागमध्ये एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. तसेच नागरिकांना सतर्कत राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता निसर्ग अलिबागला धडकण्याची शक्यता आहे, … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

.. म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना तातडीनं फोन

नवी दिल्ली । अम्फान या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नौदल आणि भारतीय सैन्यही अलर्टवर आहे. नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी … Read more