‘एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त ठिगळं नको’, प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. दरम्यान त्यांनी तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत, असा … Read more

“असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार?”‘ चेंबूर दुर्घटनेनंतर दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यासह मुंबई व उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण … Read more

टेंडर फिस्कटले, कमिशनही बुडाले म्हणून ठाकरे सरकारनं कुभांड रचले : प्रवीण दरेकरांचा टोला

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जे मंत्री किंवा महाविकास आघाडीचे नेते रेमडेसिवीरसंदर्भात भाजपाच्या बाबतीत साप साप करत भुई थोपटत होते. त्यांचं थोबाड फुटलेलं आहे,  रेमडेसिवीर टेंडर फिस्कटले, कमिशनही बुडाले म्हणून ठाकरे सरकारनं कुभांड रचले, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. #Remdisivir चे … Read more

“….हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस”; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला

jitendra avhad devendra fadanvis

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना शनिवारी रात्रीपासून राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर, भाजपा नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे … Read more

देवेंद्रजी हा कोणता महाराष्ट्र धर्म ?? रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या उपचारामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. दमणच्या ब्रूक फार्मा या औषधं निर्माण कंपनीकडे तब्बल ६० हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक … Read more

पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही; दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांना इशारा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता … Read more

“फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती” बाळासाहेब थोरात यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. दुर्दैवाने तेच घडते आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती. परंतु तो फार्मा कंपनीवाला कुणीतरी त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे हे काही … Read more

फार्मा कंपनीच्या मालकावर कारवाई झाल्यानंतर फडणवीस, दरेकर पोलीस ठाण्यात का गेले? नवाब मलिकांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिले. “देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला … Read more

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा !

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीवरून भाजपाचे राज्यातील नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. … Read more

कंपन्यांकडे पडून असलेला 30 लाख रेमडीसिव्हरचा साठा विकण्याची परवानगी द्या : प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडिसिव्हर औषधासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट सुरू असताना दुसरीकडे हे निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडे 30 लाख रेमडीसिव्हरचा साठा पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. या कंपन्यांना विना परवाना राज्यात रेमडिसिव्हर विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी … Read more