आता रश्मी बागल यांचं पुढं काय ?

करमाळा प्रतिनिधी | राष्ट्रवादीशी बंडखोरी करत, शिवसेनेत रश्मी बागल यांनी प्रवेश केला.बागलांच्या प्रवेशामुळे नारायण पाटील यांचे तिकीट सेनेने कट केले होते. बागलांचा विजय सेनेच्या तिकिटावर येईल असा विश्वास होता. मात्र अपक्ष संजय शिंदे यांनी त्यांचा तब्बल २५ हजार मताधिक्याने पराभव केला. तर नारायण पाटील यांनी शिंदेंना चांगलीच टफ दिली, खेचा खेचीच्या निकालानंतर शिंदे विजयी झाले. … Read more

‘हम होंगे कामयाब…’  संजय राऊतांचे हॉस्पिटल मधून ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटलेली नाही असा विश्वास व्यक्त केला. संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना काल पासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं … Read more

गिरीश महाजनांच्या शुभेच्छांमुळे अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या वाटेवर..!!

Ajit Pawar set to become CM. Maharashtra Governor called NCP to form the government in maharashtra.

राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास.. पक्षांतर केलेले घरवापसी करणार का?

राज्यातील सत्तास्थापनेचा खेळ आता चांगलाच रंगत आलेला असताना शिवसेनेची शिकार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा आपला मार्ग मोकळा केला आहे. ताज्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास दिले आहेत. अशी माहहती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीने केली सेनेच्या वाघाची शिकार! राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार

: राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंब्याचे पत्रचं मिळालं नसल्याने राज्यपालांकडे त्यांना नियोजित अवधीत सत्तास्थापनेचा दावा करताच आला नाही. आदित्य ठाकरेंच्या नैत्रुत्वात शिवसेनेने राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्यासाठी वाढीव तीन दिवसांचा अवधी मागितला होता परंतु त्यांनी तो देण्यास नकार दिला. तसेच राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सेनेला पाठिंब्याचे पत्र मागितले असता शिवसेना हे पत्र दर्शवू शकलं नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दिवसभर चर्चाच करत राहिले. उद्धव ठाकरेंनी सत्तास्थापनेच्या दिशेने शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या सोबत चर्चा केली.परंतु दोन्ही पक्ष सेनेबाबत निर्णय घेण्यात असमर्थ ठरले आहेत.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं शरद पवार यांची इच्छा

काँग्रेसच्या पाठिंब्याने आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र, शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार हे अजून गुलदस्त्यात असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा पवार यांनी व्यक्त केली आहे.

अखेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच! काँग्रेसच्या पाठिंब्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार

राज्यात सत्तास्थापनेचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असून. काँग्रेसनं शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. त्यानुसार शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांचा समावेश आहे. तेव्हा राज्यात स्थापन होणार नवं सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार याबाबत शिक्कामोर्तब आता झाला आहे.

काय आहे सोनिया गांधी यांच्या मनात? काँग्रेस आमदारांशी साधला फोनवरून संपर्क

शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा कि नाही याबाबत सोनिया यांच्या घरी खलबतं सुरु आहेत. अशा वेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेस आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आता संपर्क साधला आहे. दरम्यान उद्धव यांची सोनियांसोबत फोनवर चर्चा झाल्याने सोनिया आपल्या आमदारांचे मत विचारात घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या आमदारांशी संपर्क साधला असे यामागचे कारण समोर येत आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांचं महादेवास साकडं

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत. यासाठी आज कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर असलेल्या संगमेश्वर मंदिरात शिवसैनिकांनी मंत्रौचार करत महादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला. यावेळी उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अस साकडं घातले. शिवसैनिकांनी महादेवाला घातलं. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Breaking | संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल

दिल्ली | शिवसेना नेते संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले आहेत. राऊत यांनी आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत रुग्नालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासमिकरणांबाबत देशभर चर्चा सुरु आहे. यामध्ये राऊत शिवसेनची बाजू मांडताना … Read more