मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? ; नारायण राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर अतिवृष्टीवरून व नुकसान भरपाईवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे … Read more

आघाडी सरकार जावे म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवतायत; बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून अनेक कारणे शोधत हल्लाबोल केला जात आहे. यावरून आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला. काहीजण महाविकास आघाडी सरकार कधी जातेय यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. तर काहीजण रोज स्वप्न पाहत असून स्वप्नातही ते बडबडत आहेत, असा टोला थोरात यांनी लगावला. … Read more

“आर्यनसाठी पत्रकार परिषद घ्यायला वेळ मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी नाही.”; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, अशी टीका … Read more

पेट्रोल, डिझेलची दरवाढआपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. या वाढत्या इंधन दरवाढीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर निशाणा सोडला. केंद्राकडून सध्या पेट्रोल, डिझेलची जी दरवाढ केली जात आहे ती आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित … Read more

पत्रास कारण कि…; अभिनेत्री क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी था अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले असून काही लोकांकडून आपल्या … Read more

जलयुक्त शिवारला क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नाही; ‘त्या’ अफवेवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराला राज्यातील ठाकरे सरकार कडून क्लीन चिट देण्यात आल्याच्या बातम्या पसरत होत्या. मात्र भाजप सरकारच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार गैरव्यवहार प्रकरणात कुणालाही क्लीनचिट देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकार कडून देण्यात आले आहे. तसेच ही चौकशी अजून पूर्ण झाली नसल्याने क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नाही … Read more

सात अजूबे इस दुनिया में आठवा माननीय मुख्यमंत्री हैं; सुधीर मुनगंटीवारांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. आता भाजपचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अजुबा असा उल्लेख करीत टीका केली आहे. “गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची … Read more

अगोदर भारतीय घटना वाचावी, जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

narayan rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी तुझी मर्जी म्हणजे हा तुझा अधिकार नाही. अधिकार हा वेगळा असतो आणि मर्जी ही वेगळी असती. हे कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे, असे म्हंटले होते. त्यांच्या या विधानावरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण … Read more

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांची लाथ मारून मंत्रिमंडाळातून हकालपट्टी करा – आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्याय देता आला असता तर कारण सर्वच आता न्यायाधीश झाले आहेत, असे म्हंटले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा धागा पकडून व ड्रग्ज प्रकरणी महाराष्ट्राची होणारी बदनामी यावरून यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव … Read more

राज्याच्या अधिकारावर गदा येतेय का पाहिलं पाहिजे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात एनसीबीकडून केल्या जात असलेल्या कारवाईवरून व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच महत्वाचे विधानही केले. तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, काही अधिकार वगळता राज्य सार्वभौम आहेत. राज्याच्या अधिकारावर … Read more