युती बाबत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला

मुंबई प्रतिनिधी | युती बाबत अंतिम बोलणी झाली आहेत अशा बातम्या येऊ लागल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेत उद्धव ठाकरे यांनी युतीची बोलणी लोकसभा निवडणुकीसाठीच झाली आहेत. ५०-५० टक्के जाग्यांवर आम्ही लढणार आहे हि माध्यमांनी उठवलेली बातमी आहे. वास्तवात आमच्यात जे जागा वाटप झाले आहे. त्यासंदर्भात लवकरच … Read more

युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई प्रतिनिधी |  भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सध्या अशा वळणावर आल्या आहेत कि कधी ही युती तुटू शकते अथवा कधीही युती अंतिम होऊ शकते. शिवसेना कमी पणा घ्यायला तयार नाही आणि भाजप शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास तयार नाही अशा स्थितीत युतीचे काय होणार हा यक्ष प्रश्न आहे. शिवसेना भाजप युतीचा शिवसेनेने नवीन फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला … Read more

काँग्रेस सोडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राजकारण कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात जाईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. राजकीय विचारधारा हि बाब कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. अशाच पक्षांतराच्या वादळात काँग्रेस सोडलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत फोन वरून चर्चा केल्याचे देखील … Read more

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी भाजप  आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वातील वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना आणि आपले काही वावडे नसल्याचं म्हणले आहे तसेच ते शिवसेनेला मदत करणार असल्याचे बोलले आहे.

लक्ष्मण माने म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चळवळीचे नेते आणि माझे गुरु होते. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चूक केली. मात्र, नातवंडे सुधारत असतील तर त्यांना मदत करण्याची माझी तयारी आहे.” म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा साथ देणार असं म्हणत आहेत.

माने यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचे म्हणाले.
[youtube https://www.youtube.com/watch?v=9TZnNiR7oFQ&w=560&h=315]

सेनेशी युती करा ; तडजोड नाही – ‘मोदी’ आदेश

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजपने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला तर युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यताही … Read more

शिवसेना प्रामुख्यांवर होणार वार स्वतःच्या अंगावर झेलणारा बाळासाहेबांचा निकटचा सहकारी हरपला

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक भालचंद्र ठाकूर यांचे रविवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर एक महिन्यांपासून हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने रविवारी सायंकाळी निधन झाले. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले भालचंद्र ठाकूर यांना भाऊदादा म्हणून … Read more

अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाला उद्धव ठाकरेंचा ग्रीन सिंग्नल

मुंबई प्रतिनिधी| राष्ट्रवादीचे श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना प्रवेशाबद्दल चर्चा केली आहे. सुनील तटकरे म्हणजे त्यांच्या चुलत्या सोबत त्यांची तेढ निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटली आणि शिवसेना प्रवेशाचा मनसुबा बोलून दाखवला. त्याला उद्धव ठाकरेंनी दुजोरा … Read more

उद्धव ठाकरेंनी केले युतीबाबत मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपाचा जुना फॉम्युला बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘जागावाटपाचा फॉम्युला मी, मुख्यमंत्री आणि अमित शहा असे तिघेजण मिळवून ठरवू’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे … Read more

शिवसेना प्रवेशावेळी रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीवर केली हि टीका

मुंबई प्रतिनिधी | मागील १३ वर्षांपासून शरद पवारांचे बोट धरून आम्ही राजकारणात आम्ही सुरवात केली. त्यांचे व आमचे नाते एक नेता व कार्यकर्त्याच्याही पलीकडे आपुलकीचे आहे़. ते नाते कायम ठेवत जनतेला न्याय व सुरक्षितता देण्यासाठी लोकाग्रहास्तव आणि पक्ष नेतृत्त्व कामाची कदर करत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे. … Read more

आदित्य ठाकरेंचे वरातीमागून घोडे ; उद्या करणारा कोल्हापूर सांगली पूरग्रस्त भागाचा दौरा

कोल्हापूर प्रतिनिधी | शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करिता कोल्हापूर आणि  सांगली दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी शिवसेना बचाव कार्यापासून मदत कार्यात अग्रेसर असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसहाय्य योजनेतून मदतकार्याचा ओघ सुरु आहे. या अनुषंगाने पाहणी करण्याकरिता आणि … Read more